AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 5:13 PM
Share

अँकर: विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावला आहे. विरेंद्र जगताप आणि उत्तरा जगताप यांना तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे. (ED summons two former presidents of Amravati District Central Co-operative Bank, orders them to appear immediately)

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपये गुंतवले

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागविले होते. अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच प्रकरणात आता ईडीने बॅंकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख व उत्तरा जगताप यांना समन्स बजावले व विना विलंब ईडी कार्यालयात हजर राहण्याच सांगितले तर पुढील महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. (ED summons two former presidents of Amravati District Central Co-operative Bank, orders them to appear immediately)

इतर बातम्या

पळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला

अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.