‘MPSC परीक्षा घ्या, रखडवलेल्या नियुक्त्या द्या नाहीतर 2024 ला इंगा दाखवतो’, लोकप्रिय शिक्षक कराळे गुरुजींचं आंदोलन

'MPSC परीक्षा घ्या, रखडवलेल्या नियुक्त्या द्या नाहीतर 2024 ला इंगा दाखवतो', लोकप्रिय शिक्षक कराळे गुरुजींचं आंदोलन
नितेश कराळे गुरुजींनी एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं...

MPSC परीक्षा घ्या, रखडवलेल्या नियुक्त्या द्या नाहीतर 2024 ला इंगा दाखवतो, असं म्हणत वऱ्हाडी शैलीत शिकविणाऱ्या लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे गुरुजींनी आज आंदोलनाचं हत्यार उपसलं.

चेतन व्यास

| Edited By: Akshay Adhav

Jul 14, 2021 | 2:22 PM

वर्धा :  MPSC परीक्षा घ्या, रखडवलेल्या नियुक्त्या द्या नाहीतर 2024 ला इंगा दाखवतो, असं म्हणत वऱ्हाडी शैलीत शिकविणाऱ्या लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे (Nitesh karale) गुरुजींनी आज आंदोलनाचं हत्यार उपसलं. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही हातात विविध फलक घेऊन आंदोलनाला गर्दी केली होती. (Famous Teacher Nitesh karale Agitaion Against Government over MPSC Student Demand)

मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षा देखील झालेल्या नाहीत त्यामुळं एमपीएससीचीच्या रखडलेल्या परीक्षा, रखडलेल्या नियुक्त्या, पोलीस भरती घेण्याच्या मागणीसाठी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन वऱ्हाडी शैलीत शिकवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या नितेश कराळे गुरुजी यांच्या नेतृत्वात करण्यात आलं.

घोषणांचे फलक घेईन सरकारचा निषेध

‘डिग्री विकणे आहे’, ‘तुमचे पोट्टे मंत्री जंत्री… आम्ही वाजवू का फक्त घंटी’, ‘मले विकत घेता का हो कोणी…?’, ‘खालती डोके वरती पाय..आता आम्ही करायचं काय?’, ‘फक्त भेटा 2024 ला दाखवतो इंगा’, असे वेगवेगळ्या घोषणांचे फलक घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक, युवती आज आंदोलनात सहभागी झाले.

सरकारविरोधात घोषणाबाजी, भरती घ्या-नियुक्ती द्या नाहीतर 2024 ला इंगा दाखवू

यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करावे, रखडलेल्या नियुक्त्या कराव्या, पोलीस भरती तातडीने जाहीर करा अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमदार खासदार यांचे पगार सुरू आहे पण मुलांचा प्रश्न येताच सरकारच्या तिजोरीत पैसा नसतो. या सरकारमुळे मुलांचं भवितव्य उघड्यावर आल्याचा आरोप कराळे गुरुजी यांनी केलाय.

हे ही वाचा :

खदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय

बँक व्यवस्थापकच दरोडेखोर, वर्धा बँक दरोड्याची फिल्मी कहानी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें