चंद्रपुरात ‘कंपन्या उशाशी, मात्र विकासात उपाशी’, नायगावच्या शेकडो शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातले नायगाव गेली काही वर्षे चर्चेचा विषय ठरले आहे. या गावालगत वर्धा पॉवर आणि जी. एम. आर. अशा 2 औष्णिक वीजनिर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्या स्थापित होताना गाव दत्तक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, गावात विकासाच्या नावावर अजून भोपळाच आहे.

चंद्रपुरात 'कंपन्या उशाशी, मात्र विकासात उपाशी', नायगावच्या शेकडो शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातले नायगाव गेली काही वर्षे चर्चेचा विषय ठरले आहे. या गावालगत वर्धा पॉवर आणि जी. एम. आर. अशा 2 औष्णिक वीजनिर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्या स्थापित होताना गाव दत्तक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, गावात विकासाच्या नावावर अजून भोपळाच आहे. या कंपन्यांनी गावाचा रस्ता तेवढा नाहीसा केलाय. याविरोधात शेतकरी-विद्यार्थी आज (25 ऑगस्ट) थेट वरोरा तहसील कार्यालयावर बैलगाड्यांसह पोचले आणि ठिय्या आंदोलन केले.

कच्च्या रोडवरुन जड वाहतूक, बस बंद, शाळकरी मुलांसाठीही रस्ता बंद

या गावात प्रशासकीय अधिकारी व राजकारणातील मातब्बर येऊन पाहणी करून जातात. मात्र, केवळ आश्वासनं मिळतात. नायगाव ते वरोरा या कच्च्या रोडवरुन 40-50 टन कोळसा भरलेल्या ट्रकची जड वाहतूक केली जाते. त्यामुळे कसातरी सुरू असलेला हा रस्ता शाळकरी मुलांसाठी देखील बंद झाला. पर्यायाने बस देखील. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य पोहचविणे अवघड झाले आहे.

शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने पीक तिथंच सडणार का?

अत्यंत चाळण झालेल्या या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन पिकाची काढणी काही दिवसात सुरू होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पीक तिथेच सडणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या सगळ्या बाबीचे निवेदन देण्यासाठी विद्यार्थी व शेतकरी थेट तहसीलदारांच्या दारात पोचहचलेत.

तहसीलदारांनी संवेदनशीलता दाखवत मागण्या मान्य करत कोळशाची जड वाहतूक त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठीही आश्वासन दिलं. त्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.

हेही वाचा :

चिमूर नगरपरिषदेचा प्रताप, उमा नदीपात्रात कचरा डम्पिंग, नदी प्रदूषित, स्थानिक दुर्गंधीने त्रस्त

सावकाराचं घर, जवळच्याच माणसाकडून घरफोडी, 40 लाख लंपास, चंद्रपुरातील चोरीचं गूढ उकललं

महापौरांच्या ‘नगरसेवक पती’कडून जीवे मारण्याची धमकी, मनपा उपायुक्तांची पोलिसात तक्रार

व्हिडीओ पाहा :

Farmers protest against industrial traffic in Naygaon Varora Chandrapur

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI