Vasai Fraud : एटीएम कार्डाचा डाटा चोरून ग्राहकांची आर्थिक फसवणूक, आंतरराज्य टोळीचा वसईत भांडाफोड
हे सर्वजण संगनमत करून स्कीमर मशीन एटीएममध्ये बसवून, पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आलेल्या ग्राहकांच्या एटीएमचा सर्व डाटा स्कॅन करून घेत होते. त्यानंतर ते स्कीमर लॅपटॉपला लावून, सॉफ्टवेअरचा वापर करून, तो डाटा दुसऱ्या बनावट एटीएममध्ये टाकून ग्राहकांचे एटीएममधील पैसे काढत होते. हे सराईत गुन्हेगार एटीएममध्ये कोणी नसल्याचे पाहून अवघ्या दीड ते 2 मिनिटात स्कीमर मशीनमध्ये बसवत होते.

वसई : एटीएम वापरणाऱ्यांनो आता सावधान.. एटीएम मशीनमध्ये स्कीमर मशीन बसवून, तुमच्या एटीएमचा डेटा स्कॅन करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीचा वसई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीतील 4 जणांना माणिकपूर पोलिसांनी 30 एप्रिल रोजी अटक (Arrest) केले आहे. या आरोपीकडून 4 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी एटीएमचा डेटा स्कॅन करुन नंतर दुसऱ्या बनावट एटीएमने ग्राहकांचे एटीएमद्वारे पैसे काढत असत. ही स्कीमर टोळी वसई विरारसह मुंबई, ठाणे, पालघर परिसरात आंतरराज्य टोळी सक्रिय झाली आहे. सौरभ उज्वलकुमार यादव, धनराज केशो पासवान, पवनकुमार अखिलेश पासवान, राकेश कारू चौधरी अशी या टोळीतील अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नाव असून हे सर्वजण बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. (Financial fraud of customers by stealing ATM card data, interstate gang scam in Vasai)
स्कीमर मशिन एटीएममध्ये डेटा चोरायचे
या टोळीतील सौरभ यादव हा मुख्य मास्टर माईंड आहे. हे सर्वजण संगनमत करून स्कीमर मशीन एटीएममध्ये बसवून, पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आलेल्या ग्राहकांच्या एटीएमचा सर्व डाटा स्कॅन करून घेत होते. त्यानंतर ते स्कीमर लॅपटॉपला लावून, सॉफ्टवेअरचा वापर करून, तो डाटा दुसऱ्या बनावट एटीएममध्ये टाकून ग्राहकांचे एटीएममधील पैसे काढत होते. हे सराईत गुन्हेगार एटीएममध्ये कोणी नसल्याचे पाहून अवघ्या दीड ते 2 मिनिटात स्कीमर मशीनमध्ये बसवत होते. त्यानंतर एटीएम मशीनच्या बाजूला किंवा, एटीएमच्या बाहेर उभे राहायचे. जर कुणाला एटीएममध्ये पैसे काढताना अडचण झाली तर त्यांना पैसे काढून देण्याच्या नावाखाली एटीएमची ही अदलाबदल करायचे. अन्यथा स्कीमर मशीनने तर ग्राहकांच्या एटीएमचा पूर्ण डाटा स्कॅन होतच होता. अशा प्रकारच्या घटना वसई विरार सह मुंबई, ठाणे, पालघर परिसरात वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी यावर पाळत ठेवली होती.
आरोपींकडून 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त
एटीएममध्ये स्कीमर मशीन बसविण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सचिन सानप आणि त्यांच्या टीमला मिळाली होती. त्यांनी सापळा रचून मास्टर माईंड सौरभ यादवला पहिल्यांदा ताब्यात घेतले. आरोपीकडे एक स्कीमर मशीन मिळाली. नंतर त्याच्या विरार येथील घराची झडती घेतली असता 3 लॅपटॉप, 4 एटीएम कार्ड क्लोनर, 08 एटीएम स्कीमर मशीन, 05 मोबाईल, विविध बँकेचे 103 एटीएम कार्ड, 2 नोटबुक ज्यावर otp आणि पिन नंबर लिहले होते, एक मोटारसायकल असा 1 लाख 14 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यानंतर यांच्या सर्व टोळीचा तपास लावून आणखी बिहार राज्यातील अन्य 3 जणांना अटक केली आहे.
या चारही सराईत गुन्हेगारांवर वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471, 34 भादवी सह कलम 66 (क) 66(ड), माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांनी आपले एटीएम कुणाच्या हातात देऊ नये. आपला पिन कोड, किंवा ओटीपी नंबर कुणाला सांगू नये अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Financial fraud of customers by stealing ATM card data, interstate gang scam in Vasai)
