AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अडचणीत वाढ, ते वादग्रस्त विधान भोवले, अटकेची टागंती तलवार, अपडेट काय?

FIR against Laxman Dhobale : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मातंग समाजाच्या मोर्चाच्या स्टेजवरून जाती वाचक भाष्य आणि महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अडचणीत वाढ, ते वादग्रस्त विधान भोवले, अटकेची टागंती तलवार, अपडेट काय?
लक्ष्मणराव ढोंबळे यांच्या अडचणीत वाढ
| Updated on: Sep 22, 2026 | 10:03 AM
Share

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना ढोबळे यांची जीभ घसरली होती. त्यांनी भाषण करताना जातीवाचक वक्तव्य केले होते. तर महिलांबद्दलही अपशब्द वापरले होते. आता सकल मातंग समाजाच्या मोर्चाच्या स्टेजवरून जाती वाचक भाष्य आणि महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनंतर गुन्हा दाखल

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक भाष्य आणि विशिष्ट समाजाच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी नांदेड शहरातील वजीराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर रोजी नांदेड मध्ये आरक्षण उपवर्गीकरनाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाषण करताना जातीवाचक भाष्य केले तसेच एका जातीच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. याबाबत माजी नगरसेविका अंजली गायकवाड यांनी तक्रार दिलीये. त्यावरून रात्री वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेविका आक्रमक, रात्रीतून कारवाई

13 सप्टेंबर रोजी नांदेड शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. सकल मातंग समाजाने हा भव्य मोर्चा आयोजित केला होता. या जनआक्रोश मोर्चाचे पुढे सभेत रुपांतरण झाले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी प्रमुख वक्ता म्हणून भाषण केले. पण भाषणादरम्यान त्यांची जीभ घसरली. त्यांनी जातीवाचक टिप्पणी करत महिलांबाबत असभ्य भाषेचा वापर केला. यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी करण्यात आली.

ढोबळे यांच्या या वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ढोबळेंविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. माजी नगरसेविका अंजली गायकवाड यांनी तातडीने वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारी आधारे रात्री उशीरा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात विविध कलमांआधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे नांदेडसह राज्यातील राजकीय वातावरण तापले. गेल्या काही दिवसांपासून आरक्षण उपवर्गीकरणावरून दोन वर्ग आमने-सामने आल्याचे दिसत आहेत. काही जण हा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत आहेत. काही जणांचा उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे, तर काहींनी त्याला कडाडून विरोध केला आहे.

Follow Us
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह