उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब साहेबराव रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रोचकरी यांच्यावर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद झालाय. याचा तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत.