कोल्हापूर: किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा हसन मुश्रीफ यांनी दाखल केला आहे. कारखान्यांबद्दल त्यांनी जे आरोप केले होते ते आरोप गेल्या आठ दहा वर्षांच्या काळातील होते. माझ्या मंत्रिपदाच्या काळातील प्रकरण काढण्याचं आव्हान दिलं होतं. किरीट सोमय्यांनी त्यानंतर ग्राम विकास विभागासंदर्भात आरोप केला. ग्राम विकास विभागानं 10 जानेवारी 2021 ला आपण जाहिरात प्रसिद्ध केली. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या लेखा परिक्षणात सूत्रता असावी यासाठी आपण ही व्यवस्था आणली होती. ही व्यवस्था ऐच्छिक होती. 10 मार्च 2021 ला ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीला एकही पैसा दिलेला नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.