AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या विद्यार्थिनींकडून अंधांना मदत करणाऱ्या तिसरा डोळ्याचा शोध, ‘गॅझेट’ उपकरणाची निर्मिती

भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अंधांना मदत करणारा तिसरा डोळा शोधून काढला आहे. 'गॅझेट' नावाच्या एका उपकरणाची त्यांनी निर्मिती केली आहे. equipment for Blind People

जळगावच्या विद्यार्थिनींकडून अंधांना मदत करणाऱ्या तिसरा डोळ्याचा शोध, 'गॅझेट' उपकरणाची निर्मिती
उपकरण बनवणाऱ्या विद्यार्थिनी
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 7:09 PM
Share

जळगाव: भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अंधांना मदत करणारा तिसरा डोळा शोधून काढला आहे. ‘गॅझेट’ नावाच्या एका उपकरणाची त्यांनी निर्मिती केली आहे. या उपकरणाच्या माध्यमातून अंधांना रस्त्यावरील अडथळ्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे ते कोणाच्याही मदतीविना सहज चालू-फिरू शकणार आहेत. (Jalgaon Busaval Shree Sant Gadage Baba Engineering College students make equipment for Blind People)

गॅझेट उपकरणाची निर्मिती का केली?

भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बऱ्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी ‘द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल’ या संकल्पनेवर आधारित गॅझेट उपकरणाची निर्मिती केली आहे. या कामी त्यांना प्रा. धीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

अर्डिनो प्रणालीवर आधारित आहे उपकरण

एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी अंध व्यक्तींना भेडसावत असतात. प्रत्येक वेळी रस्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारे गॅझेट्स अंध व्यक्तींची मदत करणार आहे. दृष्टिबाधित लोकांना वेगाने चालत जाता यावे म्हणून अल्ट्रासोनिक लाटांच्या मदतीने जवळपासच्या अडथळ्यांना जाणून घेण्यास मदत होईल, असा या उपकरणाच्या निर्मिती मागचा उद्देश आहे.

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापरून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर 04 अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर, बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पिन या सारख्या उपकरणांच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे उपकरणाच्या डिझाईनसाठी कमी वेळ लागला व त्याचा उत्पादन खर्चही कमी आहे. अवघ्या दोन ते अडीच हजारात हे उपकरण बनवले आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र कुठेही सहज नेऊ शकतील, असे उपकरण बनवणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितले.

संबंधित बातम्या:

UK FCDO आणि महाराष्ट्र राज्यात सामंजस्य करार, हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळणार

राज्य सहकारी बँकेचा नफ्याचा चौकार, सलग चौथ्या वर्षी बँकेला 369 कोटींचा नफा, प्रशासकांची माहिती

(Jalgaon Busaval Shree Sant Gadage Baba Engineering College students make equipment for Blind People)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.