पोलीस अधिकाऱ्यानं लावली दोन पहिलवानांची कुस्ती, जळगावच्या वरणगावात कोरोना नियमांना तिलांजली

अनिल आक्रे

अनिल आक्रे | Edited By: Yuvraj Jadhav

Updated on: Sep 05, 2021 | 10:29 PM

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळेत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुस्त्यांची दंगल भरण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दोन पहिलवानांची कुस्ती लावली आहे.

पोलीस अधिकाऱ्यानं लावली दोन पहिलवानांची कुस्ती, जळगावच्या वरणगावात कोरोना नियमांना तिलांजली
वरणगाव

जळगाव: भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळेत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुस्त्यांची दंगल भरण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दोन पहिलवानांची कुस्ती लावली आहे. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक शेखऱ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कुस्त्यांच्या आयोजनावर निर्बंध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने कुस्त्यांच्या दंगलीवर किंवा कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत, परंतु शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान व्यायाम शाळा शाळेत कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक पहिलवानांनी भाग घेतला असून या दंगलीत 25 कुस्त्या लावण्यात होत्या. तसेच ही कुस्ती दंगल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून कुणीही मास्क लावला नव्हता.

पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?

कुस्त्यांची दंगल भरवण्यासाठी शासनाची परवानगी नसल्याने सदर आयोजकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु या कुस्ती दंगलीत प्रत्यक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाला असून त्यांच्या माध्यमातून दोन पहिलवानांची कुस्ती लावण्यात आली. त्यामुळे आत्ता यांच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अस म्हणत या विषयाला बगल दिली आहे. असून पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी स्वतः कुस्ती दंगल लावून होती. यांच्याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात असल्याची माहिती नाशिक मंडळाचे आई जी डॉ. बी.जे. शेखर पाटील यांनी दिले आहेत.

योग्य ती कारवाई करणार

भुसावळ येथे शांतता कमिटीची बैठक साठी आई जी . डॉक्टर .बी जे शेखर पाटील आले होते त्यावेळी वरणगाव येथे घेण्यात आलेल्या कुस्ती दंगल बाबत विचारले असता वरणगाव चे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांची चौकशी करून योग्य ते कारवाई करणार असल्याचे माहिती शेखर पाटील यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमातही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

डोंबिवली पूर्वेकडील नगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले. असाच एक सल्ला कोरोना बाबत दिला तिसरी लाट हलक्यात घेऊ नका हा व्हेरियट खूप धोकादायक आहे असं आव्हाडांनी सांगितलं. मात्र ,प्रत्यक्षात याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांच पालन करण्यात आलं नव्हतं ,सोशल डिस्टसिंग सोडाच पण बहुतांश कार्यकर्त्याना मास्कचा देखील विसर पडल्याचे दिसून आले. सर्व सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या पालिका प्रशासन व पोलीस या मेळाव्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या:

शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट,राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांची शाळा

भाजपमध्ये काय दुधानं धुतलेली लोकं आहेत का? ईडी सीबीआयचा गैरवापर होतोय,नाना पटोलेंचा आरोप

Jalgaon Police Inspector starts wrestling match in varangaon village of Jalgoan district

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI