कामावरुन घरी जाताना काळाचा घाला, दुचाकीवरचा ताबा सुटला, तरुणाचा पंचगंगेत बुडून मृत्यू
दुचाकीवरचा ताबा सुटल्याने कोल्हापूरच्या दुचाकीस्वराचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दुर्दैवीरित्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.

ताबा सुटल्याने दुचाकीसह दुचाकीस्वार पंचगंगा नदीत बुडाला
कोल्हापूर : दुचाकीवरचा ताबा सुटल्याने कोल्हापूरच्या दुचाकीस्वराचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दुर्दैवीरित्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.
दोघेही कामावरून घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी दुचाकीस्वाराचा मृत्यूदेह नदीतून बाहेर काढला. मृत दुचाकीस्वराची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
