कोकणात रिफायनरीवरून वातावरण गरम, कंपनीकडून नव्या जागेची पाहणी, तिथेही समर्थक आणि विरोधक!

रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आलाय. नाणार परिसरातील रिफायनरीचा विरोध लक्षात घेता कंपनीनं बारसू आणि सोलगाव परिसरात जागेची चाचपणी सुरु केली.. इथल्या ग्रामस्थांनीही रिफायनरीला समर्थन दर्शवत जागा देण्याची तयारी देखील दर्शवली. त्यामुळे या परिसरातील रिफायनरी समर्थक गट तयार झालाय.

कोकणात रिफायनरीवरून वातावरण गरम, कंपनीकडून नव्या जागेची पाहणी, तिथेही समर्थक आणि विरोधक!
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प

रत्नागिरी : रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आलाय. नाणार परिसरातील रिफायनरीचा विरोध लक्षात घेता कंपनीनं बारसू आणि सोलगाव परिसरात जागेची चाचपणी सुरु केली.. इथल्या ग्रामस्थांनीही रिफायनरीला समर्थन दर्शवत जागा देण्याची तयारी देखील दर्शवली. त्यामुळे या परिसरातील रिफायनरी समर्थक गट तयार झालाय. परंतु या परिसरात रिफायनरी होऊ देणार नाही, असाही गट तयार झालाय. त्यामुळे विरोधासाठी संघर्ष समिती देखील निर्माण झाली.विरोधकांनंतर आता समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी देखील रिफायनरी समर्थक समितीची स्थापना केली (Konkan Nanar Refinery project shivsena Nanar supporters and opponents).

रिफायनरी प्रकल्पासाठी समिती स्थापन, अध्यक्षपदी कट्टर शिवसैनिक!

नाणार रिफायनरीला शिवसेनेचा विरोध होता… आता रिफायनरीचं समर्थन काही शिवसैनिक करत आहेत. राजापूरमधील शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे समन्वय समितीमध्ये कट्टर शिवसैनिक आहेत… समितीच्या अध्यक्षपदी देखील कट्टर शिवसैनिक आहे. बारसू – सोलगाव भागात रिफायनरी प्रकल्पासाठी समिती स्थापन केली गेलीय. देवाचे गोठणे – सोलगाव – नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना झालीय. 36 जणांची समिती ही समिती आहे… यात कडव्या आणि कट्टर शिवसैनिकांचा देखील समितीत सहभाग असल्यानं आता शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण झालाय.

नव्या जागेची चाचपणी….

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरणाच्या कारखान्याला विरोध झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगांव इथं प्रकल्प व्हावा किंवा केला जावा याबाबच्या चर्चा सुरू झाल्या. शिवाय, चाचपणी देखील होत असल्याची माहिती आहे. पण, रिफायनरीच्या या नव्या जागेबाबत विरोधही होत आहे. कारण, बारसू आणि सोलगांव या दोन गावांपैकी सोलगाव या ग्रामपंचायतीनं एमआयडीसी आणि रिफायनरीला विरोध असल्याचा ठराव केला आहे.

28 जून रोजी याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. तर, शिवणे खुर्द या गावानं देखील रिफायनरी आणि एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केला आहे. 16 एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत झालेला ठराव झाला आहे. 6 जूनची तारीख त्यावर टाकत त्याची नकल केली गेली आहे. त्यामुळे आता नव्या जागेबाबत देखील सध्या विरोध दिसून येत आहे.

विरोधक आणि समर्थक, रिफायनरीवरून वातावरण गरम!

या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमिन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. याविरोधात 30 जून रोजी बारसु – सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची देखील स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या साऱ्या घडामोडी घडत असल्या तरी रिफायनरी समर्थकांकडे किंवा त्यांच्या हालचाली आणि भू्मिकांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

कारण, रिफायनरी कोकणात पर्यायानं राजापूर तालुक्यातच व्हावी या समर्थक गट देखील आक्रमक आहे. त्यांच्याकडून देखील याबाबत शक्तीप्रदर्शन केलं जाणार हे निश्चित. शिवाय, सध्या रिफायनरी व्हावी अशा लोकांची संख्या वाढत आहे, असा दावा किंवा चर्चा देखील राजापूर तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे आता आगामी काळात रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण गरमागरम झालेलं दिसून येऊ शकते. परिणामी याच घडामोडींवर आता रिफायनरीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

Konkan Nanar Refinery project shivsena Nanar supporters and opponents

संबंधित बातम्या :

कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

रिफायनरी प्रकल्प नाणारऐवजी कोकणातच होणार?; रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांची पाहणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI