AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत; तेलंगणा राज्यातून सिरोंचात येणाऱ्या विद्युत टॉवर लाइनवर चर्चा

सिरोंचा तालुका महाराष्ट्रातील शेवटच्या तालुका आहे. आल्लापल्ली जवळपास शंभर किलोमीटर जंगलातून जवळपास 70-80 वर्षे जुनी असलेली लाईनवर सिरोंचाचा विद्युत कारभार चालतो. या जुन्या लाईनमुळे सिरोंचा तालुक्यातील व शहरातील अनेक समस्यांचा सामना या विद्युतमुळे करावा लागत आहे.

Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत; तेलंगणा राज्यातून सिरोंचात येणाऱ्या विद्युत टॉवर लाइनवर चर्चा
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 6:03 PM
Share

गडचिरोली : सिंहस्थ कुंभमेळाच्या (Simhast Kumbh Mela ) दर्शनासाठी आलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सिरोंचा व कालेश्वर येथे दर्शन घेतले. त्यानंतर अनेक विकास मुद्द्यांवर चर्चा केली. तेलंगणा राज्यातून येणाऱ्या विद्युत टावर लाइनचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाचे आपण दखल घेऊन शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा, अशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करण्यात आली. टॉवर लाइनचे काम पूर्ण झाल्यास सिरोंचात (Sironcha) लोडशेडिंग (Loadshedding) किंवा विद्युत समस्येची समस्या राहणार नाही. तेलंगणा राज्यात दोन विद्युत लाईन सुरु झाल्यास यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या कामाची दखल घेतली जाईल अशी हमी दिली. ही मुद्दा टीव्ही नाईन मराठीनं उचलून धरलाय.

दोन वर्षांपासून कासवगतीने काम

सिरोंचा तालुका महाराष्ट्रातील शेवटच्या तालुका आहे. आल्लापल्ली जवळपास शंभर किलोमीटर जंगलातून जवळपास 70-80 वर्षे जुनी असलेली लाईनवर सिरोंचाचा विद्युत कारभार चालतो. या जुन्या लाईनमुळे सिरोंचा तालुक्यातील व शहरातील अनेक समस्यांचा सामना या विद्युतमुळे करावा लागत आहे. जंगल क्षेत्र मोठा असल्यामुळे तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात जोडण्यासाठी टावर लाइनची मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे.

हेही होते उपस्थित

या कामाची तक्रार थेट महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. यावर शासनाने पाठपुरावा करावा, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, भाजपचे पदाधिकारी दामोदर अरिगेला, शंकर नरहरी यावेळी उपस्थित होते.

Akola Shiv Sena | भोंगा कोणाचा, हनुमान चालीसा कोण बोलतेय? सचिन अहीर यांची भाजपवर खोचक टीका!

Nagpur Crime | हैदराबादवरून एमपीकडं जाणारा 197 किलो गांजा जप्त, नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Anil Bonde | राज्यात आणीबाणीची परिस्थिती; अनिल बोंडे म्हणतात, शिवसेनेची ही शेवटची फडफड, कारण काय?

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.