“चुकले म्हणून शिकले, बदल घडवला;” गौतमी पाटील म्हणते, अश्लीलपणा…

मी चुकले. त्यात मी सुधारणा केल्यात. भविष्यात चित्रपटाच्या माध्यामातून येणार आहे. घुंगरू चित्रपट येतोय. तसेच दोन-तीन गाणे येणार आहेत. हे पण तुम्ही बघालचं.

चुकले म्हणून शिकले, बदल घडवला; गौतमी पाटील म्हणते, अश्लीलपणा...
गौतमी पाटील
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:33 AM

सातारा : खोजेवाडी येथे पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. अनेक गाण्यांवर गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याविष्काराने तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी साताऱ्यात कार्यक्रम करून खूप चांगला अनुभव येत आहे. अलीकडच्या दिवसात कार्यक्रमाच्या निमित्ताने सारखा येण्याचा योग येत असल्याचे गौतमी पाटील म्हणाली. साताऱ्याचे लोकं खूप चांगले आहेत. त्यांचे प्रेम बघून खूप छान वाटते. या कार्यक्रमाला खूप गर्दी होती.

अश्लीलपणा मी कधीच सोडलाय

गौतमी पाटील म्हणाले, आधी माझ्याकडून काही चुका झाल्या. त्यामुळे मी बदल घडवला आहे. यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. आणखी काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला कुणालाही वाईट म्हणायचं नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील. पण, त्या चुका मी परत करत नाही. त्यात खूप सुधारणा झाल्यात. त्यामुळे काय सुधारणा झाल्या. त्या बघा त्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. अश्लीलपणा मी कधीच सोडलाय.

घुंगरु चित्रपटातून येणार नव्या रुपात

तुम्ही मला सांगितलं की, मी चुकले. त्यात मी सुधारणा केल्यात. भविष्यात चित्रपटाच्या माध्यामातून येणार आहे. घुंगरू चित्रपट येतोय. तसेच दोन-तीन गाणे येणार आहेत. हे पण तुम्ही बघालचं. प्रेम द्या, अशी विनंतीही गौतमी पाटील हिने तिच्या चाहत्यांनी केली. आणखी साताऱ्यात एक-दोन आर्डर असल्याचंही गौतमी पाटील हिने सांगितलं.

जय खान्देश म्हणत जपली बांधीलकी

गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातली आहे. गौतमी पाटील हिला खान्देश कन्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ती मूळची धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील आहे. त्यामुळे खान्देशात एका कार्यक्रमात गौतमी पाटीलचा खान्देश कन्या म्हणून गौरव करण्यात आला होता. गौतमी पाटील हिने जय खान्देश म्हणत मायदेशी असलेली बांधीलकी जपली आहे.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.