Video : Gadchiroli Leopard attack | गडचिरोलीच्या कोरची भागात बिबट्याचा हैदौस, धावत्या वाहनचालकावर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद

अचानक बिबट्याने उंच झेप घेतली. हा बिबट्या त्या गाडीचालकाच्या अंगावर तुटून पडला. गाडीचालकाला पाडून त्यानं पुढील मार्ग शोधला. तोपर्यंत दुचाकीचालक गाडीवरून खाली पडला. तो जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Video : Gadchiroli Leopard attack | गडचिरोलीच्या कोरची भागात बिबट्याचा हैदौस, धावत्या वाहनचालकावर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद
जंगलाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकावर बिबट्याचा थरारक हल्ला
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:37 PM

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची भागात (Korchi Marg) बिबट्याचा हैदोस सुरू आहे. दोन हल्ल्यात दोन इसम जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे. आज कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला करून एक दुचाकीस्वाराला जखमी (two-wheeler driver injured) केले. आज पहाटे बिबट्याने नागपूरवरून गडचिरोली कोरचीकडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला. या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली असून गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी या चालकाला पाठवण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आज कोरची कुरखेडा मार्गावर (Korchi-Kurkheda Marg) दोन घटना घडल्या. या घटनांमुळं स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाहा व्हिडीओ

अशी घडली घटना

दुचाकीचालक गाडीने जंगलाच्या रस्त्यातून जात आहे. समोरून आधीच एक दुचाकी गेली. त्यापाठोपाठ दुसरी दुचाकी जात आहे. अचानक बिबट्याने उंच झेप घेतली. हा बिबट्या त्या गाडीचालकाच्या अंगावर तुटून पडला. गाडीचालकाला पाडून त्यानं पुढील मार्ग शोधला. तोपर्यंत दुचाकीचालक गाडीवरून खाली पडला. तो जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनांमुळं वन्यप्राण्यांची भीती अधिकच वाढली आहे. रस्त्यावरून ये-जा करायची नाही काय, असा प्रश्न लोकं विचारत आहेत. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

मृतकांच्या नातेवाईकांनी मदतीची मागणी

दुसरीकडं, देसाईगंज तालुक्यात वाघाने हैदोस घातला. नरभक्षक वाघामुळं नागरिक हैराण आहेत. आरमोरी तालुक्यातही दोघांचा वाघाने बळी घेतला. त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.