Maharashtra Night Curfew : राज्यात नाईट कर्फ्यू लागणार? केंद्राच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता, राजेश टोपेंचं सूचक वक्तव्य

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं नाईट कर्फ्यू आणि इतर सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Night Curfew : राज्यात नाईट कर्फ्यू लागणार? केंद्राच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता, राजेश टोपेंचं सूचक वक्तव्य
नाईट कर्फ्यू
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 6:54 PM

जालना: केरळमध्ये ओनम उत्सवामध्ये 30 ते 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. केरळचा अनुभव पाहाता आपल्याला सावध होणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्रानं ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अधिक प्रमाणात आहे, तिथं नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं नाईट कर्फ्यू आणि इतर सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सचा विचार

राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा सुरू करण्याबत विचार सुरु आहे. तसेच 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राइव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम

शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावलं टाकण्यात येत आहेत.

केंद्रानं राज्य सरकारला नेमंक काय सांगितलं?

केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम, कोविड सुसंगत वर्तणूक याचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्गाचा दर आहे तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.

शनिवारी 4381 रुग्णांची नोद

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आरोग्य विभागाच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी 4 हजार 455 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 62 लाख 59 हजार 906 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.02 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्केंवर पोहोचला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 2 हजार 357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

इतर बातम्या:

कोरोनानं पुन्हा अमेरिकेचं कंबरडं मोडलं, रोज 1 लाख नवे रुग्ण, शवागृहात मृतदेहांचा खच, जग पुन्हा दहशतीत

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, शनिवारी 126 जणांचा कोविडनं मृत्यू

Maharashtra Corona Update Night curfew will be imposed in state as per guidelines of Center Rajesh Tope said Uddhav Thackeray will take appropriate decision

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.