Varsha Gaikwad: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, भरधाव टेम्पोची कारला धडक

Varsha Gaikwad: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, भरधाव टेम्पोची कारला धडक
वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.

रमेश चेंडके

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 10, 2021 | 3:29 PM

हिंगोली: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. आज सकाळी वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोनं मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत. (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad Car accident at Hingoli but she is safe )

अपघात कसा घडला

वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेली नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं आहे. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

वर्षा गायकवाड दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर

वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री असून हिंगोलीच्या पालकमंत्री देखील आहेत. हिंगोलीतील कामाचा आढावा घेण्यासाठी त्या कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला.

आरटीआय कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई

कोरोना काळात कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करू नये, असे स्पष्ट आदेश असताना देखील मुंबई, नवी मुंबईतील शाळांनी फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे यासह शिक्षण अधिकार अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 शाळांवर अखेर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोली मध्ये पत्रकारांशी  बोलताना  दिली होती.


संंबंधित बातम्या:

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad | राज्यात शिक्षण सेवकांसाठी मेगाभरती, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती

(Maharashtra Education Minister Varsha Gaikwad Car accident at Hingoli but she is safe )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें