AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंगराला भेगा, घरांना तडे, ग्रामस्थांमध्ये भीती, पडलेल्या पुलाला शिडया लावून लहान बाळासह ढेबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर

डोंगरात जमिनीला भेगा पडून घरांना तडे गेल्याने ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी जितकरवाडी येथील 32 कुटुंबातील 80 जणांनी आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे आश्रय घेतला.

डोंगराला भेगा, घरांना तडे, ग्रामस्थांमध्ये भीती, पडलेल्या पुलाला शिडया लावून लहान बाळासह ढेबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर
डोंगराला भेगा, घरांना तडे, ग्रामस्थांमध्ये भीती, पडलेल्या पुलाला शिडया लावून लहान बाळासह ढेबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 28, 2021 | 10:46 AM
Share

कराड : डोंगरात जमिनीला भेगा पडून घरांना तडे गेल्याने ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी जितकरवाडी येथील 32 कुटुंबातील 80 जणांनी आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे आश्रय घेतला. गावाजवळचा पूल तुटल्याने त्यावर शिड्या लावून आणि मानवी साखळी करून त्यांनी वांगनदी ओलांडली. पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने हे मदत कार्य राबविण्यात आले.

23 कुटुंबातील 93 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

मराठवाडी धरणाच्या जलाशयापासूनच लगतच डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी या छोट्याशा वाड्या वसलेल्या आहेत. यापैकी जितकरवाडी लगतचा डोंगर घसरून दरडी कोसळू लागल्याने दोनच दिवसांपूर्वी तेथील 23 कुटुंबातील 93 जणांना सुरक्षेच्या कारणास्तव जिंती येथील विद्यालयात हलविण्यात आले आहे.

डोंगराला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीती

जितकरवाडी जवळच ओढ्यापलीकडे असलेल्या निगडे ग्रामपंचायतीच्या कक्षेतील धनावडेवाडी व शिंदेवाडी परिसरातही डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोकाच चुकला, गावाबाहेर पडण्याचे बंद झालेले मार्ग,खंडीत वीजपुरवठा,नॉट रिचेबल मोबाईल आणि घरात लागलेले पाण्याचे उमाळे अशा कठीण परिस्थितीत संपर्कहीन झालेल्या धनावडेवाडीकरांनी आज पावसाची उघडीप मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाच्या मदतीने तुटलेल्या पुलाला शिड्यालावून आणि छाती एवढ्या पाण्यात मानवी साखळी तयार करून नदी ओलांडली.

बचावकार्यात सगळ्यांची मदत

सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह तलाठी डी.डी डोंगरे,ग्रामसेवक थोरात,दीपक सुर्वे,पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, कपिल आगलावे, गणेश शेळके, होमगार्ड आशिष पुजारी, संग्राम देशमुख, स्वप्नील पानवळ, शुभम कचरे, विशाल मोरे यांच्या टीमने तसेच उमरकांचनचे मनोज मोहिते आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे स्थानिक ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते यांनी स्वतः वाहत्या पाण्यात उतरून मदतकार्य राबविले.

स्थलांतरित कुटुंबासाठी मदत

यावेळी शंकर पवार , प्रदीप भिसे, पराग ढोले, संभाजी कानवटे,राधेश्याम खांडेकर यांनीही सहकार्य केलेन .शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे युवा नेते यशराज देसाई यांनी जीवनावश्यक साहित्याचे किट,ब्लॅंकेट अशी मदत स्थलांतरित कुटुंबांसाठी सुपूर्द केली.

मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था

ढेबेवाडी येथील साई मंगलम कार्यालयात त्या सर्व कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून कार्यालय मालकांनी कार्यालयासह तेथील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

(Maharashtra Rain Flood Karad Dhebewadi Child With 23 Family Rescue)

हे ही वाचा :

9 महिन्यांचं बाळ अखेर सापडलंच नाही, चिमुकलीच्या वडिलांच्या सहमतीनंतर एनडीआरएफने आंबेघरमधील बचाव कार्य थांबवलं

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...