सातारा : आंबेघर दुर्घटनेतील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरडीमध्ये एकूण 15 जण दबले गेले होते. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचादेखील समावेश होता. एनडीआरएफच्या पथकाकडून कालपासून शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमतून एकूण 14 मृतदेह सापडले. पण अद्यापही दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडलेला नाही. एनडीआरएफच्या पथकाने प्रचंड मेहनत घेतली. पण प्रयत्न करुनही अद्यापही बाळ सापडलं नाही. संध्याकाळ झाल्याने अखेर बाळाच्या वडीलांच्या संमतीने एनडीआरएफने शोध मोहिम थांबवली. संबंधित दहा महिन्याच्या मुलीचं नाव हर्षदा धोंडीराम कोळेकर असं आहे.