Third Wave of Corona : एकाच महिन्यात 8881 मुलांना कोरोना, नगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं आहेत.

Third Wave of Corona : एकाच महिन्यात 8881 मुलांना कोरोना, नगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट?
Corona
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 3:42 PM

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होत असताना आता तिसरी लाट (Third Wave of Corona) आली आहे की काय असा प्रश्न आहे. कारण अहमदनगरमध्ये तब्बल 8881 मुलांना कोरोनाची (Ahmednagar third wave) बाधा झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली. (More than 8000 child tested coronavirus positive in one month at Ahmednagar Maharashtra)

लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोणत्या वयोगटातील मुलांना कोरोना?

नगर जिल्ह्यात मे महिन्यात 77 हजार 929 इतके कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 18 वर्षाखालील रुग्णांची संख्या 8881 इतकी आहे. 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण, 2694 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत, तर 18 वर्षापर्यंतच्या रुग्णांची संख्या 6102 इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

  • 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण
  • 2 ते 12 वयोगट – 2694 रुग्ण
  • 13 ते 18 वयोगट – 6102 रुग्ण

स्पेशल वॉर्ड

एका महिन्यात जवळपास 9 हजार बालकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहित धरून नगरमध्ये मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काटेकोर नियोजन केलं जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी स्पेशल रुग्णालये राखीव ठेवण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले? 

तिसरी लाट रोखण्यासाठी संकल्प

दरम्यान, दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील जनतेला संबोधित केले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला

कोरोनाची सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी 30 मे रोजी राज्याला संबोधित केलं.  ब्रेक दि चेनचे (Break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.

संबंधित बातम्या 

मुक्त संचार केला तर निर्बंध अधिक कडक करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुंबईकरांना इशारा

(More than 8000 child tested coronavirus positive in one month at Ahmednagar Maharashtra)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.