नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही

इंटरनेट सेवा नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनेक शिक्षक हे गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही
फोटो प्रातनिधिक
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:06 PM

नंदुरबार : राज्यात शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरुवात होते. मात्र महिना उलटून देखील नंदुरबार जिल्ह्यात अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नेटवर्क कम्युनिकेशनच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे आणि घेणे अवघड होत आहे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. (Nandurbar District Education books Not available After the start of this academic year)

इंटरनेट सेवा नसल्याने मुलं शिक्षणापासून वंचित

नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी इंटरनेट सेवेबाबत मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र इंटरनेट सेवा नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनेक शिक्षक हे गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे?

मात्र यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तक मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे कसे असा प्रश्न आता समोर येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 65 टक्के आदिवासी आहेत. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. तरीदेखील राज्य शासन या गोष्टीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

अद्याप पुस्तक नाही

शैक्षणिक वर्ष सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मिळाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप पुस्तक मिळाले नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी शासनाने आणि शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशीच अपेक्षा विद्यार्थ्यांनी पालकांकडून केली जात आहे.

(Nandurbar District Education books Not available After the start of this academic year)

संबंधित बातम्या : 

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

VIDEO | अंबरनाथमध्ये दोन प्रवाशांसह निघालेल्या रिक्षावर झाड कोसळलं

Aurangabad | काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील ‘ते’ आंदोलन परवानगीविना, अमित देशमुखांना वगळून इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.