Nandurbar | चांदशैली घाटात दरड कोसळल्याने गेल्या 3 दिवसांपासून वाहतूक ठप्प, नागरिकांचे मोठे हाल…

| Updated on: Aug 18, 2022 | 10:07 AM

गेल्या तीन दिवसांपूर्वी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक तीन दिवसांपासून ठप्प आहे. दरड कोसळून आज तब्बल तीन दिवस होत असूनही कोणत्याही विभागाचे अधिकारी येथे आले नाहीत किंवा दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले नाहीयं.

Nandurbar | चांदशैली घाटात दरड कोसळल्याने गेल्या 3 दिवसांपासून वाहतूक ठप्प, नागरिकांचे मोठे हाल...
Follow us on

नंदुरबार : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरूयं. यामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान (Damage) झाले असून राज्यातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरू असल्याने धडगाव तालुक्यात जाणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर चिखलाच्या साम्राज्य झालंय. यामुळे रस्त्याने (Road) ये जा करणारे शक्य होत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण वाहतूक ठप्प आहे. काही महत्वाचे काम जरी असले तरी नागरिकांना या रस्त्याने चिखलामुळे जाणे शक्य होत नाहीयं.

तीन दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प

गेल्या तीन दिवसांपूर्वी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक तीन दिवसांपासून ठप्प आहे. दरड कोसळून आज तब्बल तीन दिवस होत असूनही कोणत्याही विभागाचे अधिकारी येथे आले नाहीत किंवा दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले नाहीयं. रस्ता सुरू नसल्याने जिल्हाच्या ठिकाणी कसे पोहचायचे असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. जर गावामध्ये कोणाला काही आरोग्याची समस्या निर्माण झाली तर कसे जावे हा मोठा प्रश्न उभा आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशासनाने लवकर देऊन दरड हटवण्याची मागणी ग्रामस्थांकडून सुरू

गेल्यावर्षी दरड कोसळल्याने एका महिलेला खांद्यावर घेऊन दवाखान्यात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. मात्र दवाखान्यात उशीराने पोहचल्यामुळे महिलेला आपला जीन गमवावा लागला होता. मात्र तरी देखील या घटनेमुळे प्रशासनाने कुठलाही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून चांदशैली घाटातील रस्ता बंद असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे. प्रशासनाने लवकर लक्ष द्यावे अशी विनंती इथे नागरिक करू लागले आहेत.