गडचिरोली : जिल्ह्यात 19 जून रोजी पोलीस भरती घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) 136 शिपाई पदासाठी परीक्षा झाली. यासाठी सुमारे 17 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. पोलीस भरतीसाठी जिल्ह्यातले युवक वळलेत. हा नक्षलवादी चळवळीसाठी (Naxalite Movement) मोठा धक्का मानला जात आहे. युवक पोलीस झाले, तर आपली दहशत कशी कायम राहील, अशी भीती नक्षलवाद्यांना वाटली. त्यामुळं त्यांनी पुन्हा दशहत सुरू केली आहे. भामरागड तालुक्यातील मलमपाडूर गावात काल रात्री लकी कुमार (Lucky Kumar) नावाच्या युवकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले. त्यानंतर रात्री धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली. लकी कुमार हा पोलीस खबऱ्या असल्याचा नक्षलवाद्यांचा संशय होता. यातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय. एकंदरित पोलीसांचं वाढत प्रस्थ पाहून नक्षलवाद्यांना आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी ही हत्या केली असावी, असं सांगितलं जातंय.