महिला तहसीलदाराच्या आरोपानं लंके चक्रव्युहात, इंदोरीकर महाराज म्हणतात, कुत्रे भुंकले तरी हत्ती चालत राहतो

| Updated on: Aug 22, 2021 | 10:32 PM

"कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही," अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

महिला तहसीलदाराच्या आरोपानं लंके चक्रव्युहात, इंदोरीकर महाराज म्हणतात, कुत्रे भुंकले तरी हत्ती चालत राहतो
INDURIKAR MAHARAJ
Follow us on

अहमदनगर : “कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच चांगले काम करताना त्रास होतोच. मात्र, कोरोनातून बरा होणारा प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देतोय, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) लंके यांचं कौतूक केलं. (NCP MLA Nilesh Lanke will stay in politics upto 25 years said Indurikar Maharaj)

कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर उभारलेले आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले. या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी लंके यांचे कौतुक करत त्यांना अनेक सल्ले दिले. “चांगले काम करताना त्रास होतोच. यात कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” असे इंदोरीकर महाराज म्हणाले.

लंके पुढील 25 वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील

तसेच पुढे बोलताना इंदोरीकर महाराज यांनी लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरचा दाखला देत त्यांचे कौतूक केले. “बरा झालेला प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देत आहे. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे आशीर्वादाचे शब्द लंके यांच्यासाठी अमृतासमान आहेत,” असे इंदोरीकर महाराज म्हणाले. तसेच लोकांच्या या आशीर्वादाच्या जोरावर लंके पुढील 25 वर्षे राजकारणात सहज टिकून राहतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केलाय. एवढी लोकप्रियता मिळूनही लंके यांचे पाय जमिनीवर आहेत. तालुक्यात ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरत आहेत. कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत, याचे फळ त्यांना नक्की मिळणार आहेत, हे सांगायलाही इंदोरीकर महाराज विसरले नाहीत.

महिला तहसीलदाराचे लंके यांच्यावर गंभीर आरोप

दरम्यान, अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रासा दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.

इतर बातम्या :

मंत्रालयाबाहेर कीटनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, दोन दिवसांच्या उपचारानंतर शेतकऱ्याचं निधन, मन सुन्न करणारी घटना

Video: ताई, मामा माझी वीज कापली, लाखो रुपयांचा ऊस जळतोय; सुप्रिया सुळे,दत्तात्रय भरणेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत

(NCP MLA Nilesh Lanke will stay in politics upto 25 years said Indurikar Maharaj)