Sanjay Biyani : संजय बियाणी हत्या प्रकरण, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला अटक

| Updated on: Jun 21, 2022 | 6:33 PM

बियाणी यांच्या हत्येनंतर हत्येच्या वेळी वापरलेली दुचाकी जाळून टाकण्याचा प्रयत्न देखील झाला होता. त्यामुळे बियाणी हत्याकांडाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या हत्येतील सगळ्या आरोपींना मोक्का कायदा लावल्याने आरोपींना जामीन मिळू शकत नाही.

Sanjay Biyani : संजय बियाणी हत्या प्रकरण, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला अटक
संजय बियाणी हत्या प्रकरणातील दुचाकीच्या मालकाला अटक
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट आहे. बियाणी यांच्या हत्येवेळी वापरण्यात आलेल्या दुचाकी (Two Wheeler)च्या मालकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. सरहान चाऊस असे या दुचाकीच्या मालकाचे नाव आहे. चाऊसच्या अटकेनंतर आता या हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे. या सर्व 13 आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापैकी 11 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर दोघांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दुचाकी मालक सरहान चाऊस आणि घराची रेकी करणाऱ्या रणजित मांजरमकर या दोन आरोपींचा पोलीस कसून तपास करत होते. तपासाअंती चाऊस पोलिसांच्या हाती लागला आहे.

बियाणी यांच्या हत्येनंतर हत्येच्या वेळी वापरलेली दुचाकी जाळून टाकण्याचा प्रयत्न देखील झाला होता. त्यामुळे बियाणी हत्याकांडाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या हत्येतील सगळ्या आरोपींना मोक्का कायदा लावल्याने आरोपींना जामीन मिळू शकत नाही.

संजय बियाणी हत्येनंतर आता नवा ट्विस्ट

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबात आता नवीनच ट्विस्ट आला आहे. बियाणी यांच्या पत्नी अनिता ह्यांनी वारसदार म्हणून न्यायालयात दावा केला आहे. मात्र अन्य एका महिलेने त्यावर आक्षेप नोंदवलाय. त्या दुसऱ्या महिलेने आपली चार वर्षीय मुलगी संजय बियाणीच्या संपत्तीची वारसदार असल्याचे अनिता यांना आक्षेप घेत सांगितले. या प्रकरणात 24 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकारामुळे पुन्हा संजय बियाणी कुटुंब चर्चेत आलंय. (Owner of two-wheeler used in nanded Sanjay Biyani murder case arrested)

हे सुद्धा वाचा