Karuna Sharma : अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात करुणा शर्मांना अटक; शर्मांचा पीए म्हणून वावरणाऱ्या येरवड्यातल्या महिलेने केले गंभीर आरोप

अजय देढे आणि करुणा शर्मा यांनी पुणे येथील भोसरी परिसरात देढे याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली, असे देढेच्या पत्नीने तक्रारीत म्हटले होते.

Karuna Sharma : अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात करुणा शर्मांना अटक; शर्मांचा पीए म्हणून वावरणाऱ्या येरवड्यातल्या महिलेने केले गंभीर आरोप
करुणा शर्माImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 5:40 PM

पुणे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या करुणा शर्मा यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अजयकुमार देढेलादेखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय देढेच्या पत्नीने काल येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अजयसह करुणा शर्मांविरोधातदेखील (Karuna Sharma) ही तक्रार दाखल करण्यात आली होती. अजय देढे हा करुणा शर्माचा पीए म्हणून वावरत होता. मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजय देढेने त्याच्या पत्नीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. एवढेच नाही, तर अजय देढे आणि करुणा शर्मा हे संबंधित महिलेला धमकावतदेखील होते, अशी माहिती समोर आली आहे. करुणा शर्मांविरोधात यासंबंधी अॅट्रोसिटीचा गुन्हा (Atrocity act) आता दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

हॉकी स्टीकने धमकावले?

अजय देढे आणि करुणा शर्मा यांनी पुणे येथील भोसरी परिसरात देढे याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली, असे देढेच्या पत्नीने तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. करुणा शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या पीडितेचे वय 32 वर्ष आहे.

तक्रारीत काय?

पीडितेचा पती अजय कुमार देढेने आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला. तर करुणा शर्माने जातीवाचक शिवीगाळ केली आणि धमकावले, असा आरोपी पीडित महिलेने केला. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे, असे म्हणत पीडितेच्या पतीने तिला माहेर नेऊन सोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

पीडितेनं केलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा दाखल केलाय. कलम 498 (अ), 377, 323, 504, 506 (2), 34 अन्वये गुन्हा दाखल करून घेत करुणा शर्मांना अटक केली आहे. अनुसुचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(R)(S) अनव्येदेखील येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.