अंबाबाई मंदिरातील मार्बल काढण्याचा निर्णय, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं टेंडर मागवलं
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple ) बसवण्यात आलेल्या मार्बल (Marble ) काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple ) बसवण्यात आलेल्या मार्बल (Marble ) काढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं यासंदर्भातील टेंडर जारी केलं आहे. अंबाबाई मंदिरातील मार्बल काढण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं मंदिरातील ऐतिहासिक रुप पूर्ववत होणार आहे.
मार्बल काळजीपूर्वक काढावं लागणार
मार्बल खाली असलेल्या मूळ रचनेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मार्बल काढताना ते हातोडी आणि चिसेलचा वापर करुन काढावं लागणार आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं निविदा जारी केल्या आहेत.
मंदिरातील आर्द्रता कमी करण्यासाठी मुळची दगडी रचना उपयुक्त ठरणार आहे. मार्बल काढण्यासोबतचं वातावरण नियंत्रित ठेवण्यासाटी मेघडंबरी आणि दारांच्या आतील भाग ऑईल पेंट फ्री बनवण्यात येणार आहे. मार्बलचा वापर नियमांविरोधात अंबाबाई मंदिरात करण्यात आलेल्या मार्बलचा वापर हा ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन विषयक नियमांविरोधत होता. मार्बलचा वापर करायचा असल्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पुरातत्व विभागाची परवानगी घेणं आवश्यक होतं. अखेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मार्बल हटवण्यासंदर्भातील निविदा जारी केली आहे.
अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गंभीर बाबी समोर
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं इतिहासात पहिल्यांदाच गेल्यावर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केला होता. या ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर 5 ते 6 फुटाचा कोबा करण्यात आला आहे. मात्र मूळ मंदिराच्या बांधकामात तो दिसून येत नाही, असं महेश जाधव यांनी सांगितलं होतं. ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराच्या मूळ इमारतीवर 1 हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज बोलून दाखवली आहे. 50 ते 60 वर्षांपूर्वी मंदिरातील गळती रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने हा कोबा केला असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या:
Paschim Maharashtra Devasthan Samiti invites tender for remove marble from Ambabai Temple Kolhapur