AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्देवी… धक्कादायक… सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या 5 मजुरांचे मृतदेहच आले; कामगारांचा गुदमरून मृत्यू?

परभणीत अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी घटना घडली आहे. परभणीत सेप्टिक टँक साफ करत असतानाच पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुर्देवी... धक्कादायक... सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या 5 मजुरांचे मृतदेहच आले; कामगारांचा गुदमरून मृत्यू?
septic tanksImage Credit source: tv9 marathi
Reporter Najir Khan
Reporter Najir Khan | Edited By: | Updated on: May 12, 2023 | 7:44 AM
Share

परभणी : परभणीत अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. या मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला की गाळात अडकून मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, पाचही मजदूर एकाचवेळी दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री हा दुर्देवी प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

सेप्टिक टँकचे सफाईचे काम करत असताना झालेल्या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. मारुती राठोड यांच्या शेत शिवारात आखाड्यावर सेप्टिक टँकचे सफाईचे काम करत असताना रात्री हा प्रकार घडला. हे कामगार सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरले ते परत आलेच नाहीत. आले ते त्यांचे मृतदेह. रात्रीचा अंधार असल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. शेख सादेक 45, शेख शाहरुख 20, शेख जुनेद 29, शेख नविद 25 आणि शेख फिरोज 25 अशी या दुर्देवी घटनेतील मृतांची नावे आहेत. तर शेख साबेर हा जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाचही मृतदेह सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी व्यक्तीकडूनच हा प्रकार कसा घडला याची माहिती मिळणार असल्याने पोलीस त्याची चौकशी करणार आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

नांदेडमध्ये दोघे ठार

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील भोकर रोडवर एका ट्रकने बुलेटला धडक दिल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. खैरगांव – आमराबाद फाट्याजवळ हा अपघात झाला. खरबी गावातील लग्न समारंभ उरकून संदीप आणि राहुल काळे हे चुलत भाऊ नांदेडकडे परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला. यातील दोन्ही मयत हे नांदेड शहरातील चौफाळा भागातील रहिवासी होते.

नाशिकमध्ये दोघांचा मृत्यू

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील सवकी फाट्यावर हा विचित्र अपघात झाला असून बसने ट्रॅकरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅकर पिकअपवर जोरदार आदळला. त्यामुळे मोठा अपघात झाला. रात्री उशिरा हा अपघात झाला असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. काही गंभीर तर 15 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले असून जखमींना सटाणा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय