Maharashtra Breaking Marathi News Live | राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, राष्ट्रवादीच्या आमदाराचं भाकीत

| Updated on: May 13, 2023 | 6:15 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, राष्ट्रवादीच्या आमदाराचं भाकीत
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, एक कमांडो शहीद. पुण्यात दर गुरुवारी पाणी बंद राहणार. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिर्डीला जाणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 May 2023 08:48 PM (IST)

    सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, तीन कोटी रुपयांची ई-सिगरेट जप्त

    सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, तीन कोटी रुपयांची ई-सिगरेट जप्त

    उरण येथे जेएनपीटी बंदरातून बनावट वस्तूच्या नावाखाली तस्करी

    यावेळी सीमा शुल्क विभागाने 3 कोटींची ई-सिगरेट जप्त केली आहे

    या ई-सिगारेटच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3 कोटी रुपये आहे

  • 12 May 2023 08:39 PM (IST)

    संविधानाचं बिलकुल पालन करायचं नाही अशी भाजपची भूमिका : अशोक चव्हाण

    संविधानाचं बिलकुल पालन करायचं नाही अशी भाजपची भूमिका

    मूळ विषयाला बगल देऊन दुसरे मुद्दे उपस्थित केले जातात

    देशात महागाई आणि बेरोजगारी हटवण्यासाठी काम केलं नाही

    कर्नाटकात कॉग्रेसला बहुमत मिळेल

  • 12 May 2023 08:18 PM (IST)

    मुंबई गोवा हायवेवर एक तास वाहतूक कोंडी

    इंदापूर बाजार पेठेतील ग्राहकांच्या गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम

    मोठ्या प्रमाणात उन्हाळी सुट्ट्यामुळे ग्रामस्थ कोकणात असल्याने बाजारपेठा हाऊसफूल

    त्यामुळे महाडकडे व मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी

  • 12 May 2023 08:09 PM (IST)

    Karnataka Election Vote Counting | कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची शनिवारी मतमोजणी

    कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची उद्या म्हणजेच 13 मे रोजी मतमोजणी

    निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून काँग्सेमध्ये 2 गट

  • 12 May 2023 08:03 PM (IST)

    उद्धव ठाकरेंना नैतिकता वगैरेची भाषा शोभत नाही : राधाकृष्ण विखे पाटील

    निवडणुकीत युती म्हणून लढला आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला

    उद्धव ठाकरेंची सत्तेसाठी राष्ट्रवादीशी सोयरिक

    देशभक्ती देवभक्ती करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले

  • 12 May 2023 07:55 PM (IST)

    Jitendra Awhad | माझ्या अंदाजाने राज्यात मध्यावधी लागणार, जितेंद्र आव्हाड यांचं भाकीत

    राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अंदाज

    मध्यावधीबाबतचं विधान हे माझं वैयक्तिक, जितेंद्र आव्हाड याचं स्पष्टीकरण

    जितेंद्र आव्हाड काय म्हणाले व्हीडिओत पाहा

  • 12 May 2023 07:45 PM (IST)

    Karnatka Election Result 2023 | कर्नाटक विधानसभा निकालाआधीच राजकीय हालचालींना वेग

    कर्नाटक काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू

    मल्लिकार्जुन खर्गे,के सी वेणूगोपाल,रणदीप सुरजेवाला यांच्यात महत्वपूर्ण बैठक सुरू

    बंगळुरूच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून बैठक सुरू

    मुख्यमंत्री पदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट

    मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात स्सीखेच

  • 12 May 2023 07:36 PM (IST)

    नवी मुंबई : बेलापूर मुख्यालयासमोर धक्कादायक प्रकार

    नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेचे चित्रीकरण

    या विकृत तरुणाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

    हा विकृत राजेश राणे तरुण वकिलीच शिक्षण घेत आहेत

  • 12 May 2023 06:55 PM (IST)

    कर्नाटकमध्ये निकालाआधीच राजकीय हालचालींना वेग

    कर्नाटक काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू

    मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल,रणदीप सुरजेवाला यांच्यात बैठक

    बंगळुरूच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये बैठक

    मुख्यमंत्री पदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट

    मुख्यमंत्री पदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात रस्सीखेच

  • 12 May 2023 06:39 PM (IST)

    अकोला : प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला

    उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी

    अन्यथा विधानभवनावर घेराव घालावा

    तरच ते आमदार अपात्र होतील - प्रकाश आंबेडकर

  • 12 May 2023 06:22 PM (IST)

    मुंबई : समीर वानखेडे यांच्या घरावर छापेमारी

    एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे

    बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयची कारवाई

    एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून कारवाई

  • 12 May 2023 06:06 PM (IST)

    राज ठाकरे नालासोपारा येथे येणार

    थोड्याच वेळात राज ठाकरे नालासोपारा येथे पोहचणार

    नालासोपारा मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार

    पक्षबांधणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

  • 12 May 2023 05:54 PM (IST)

    CM Eknath Shinde : सरकार जनतेच्या दारी उपक्रम

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम

    सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर होणार

    विविध योजनांचे या उपक्रमातंर्गत लाभ मिळणार

  • 12 May 2023 05:41 PM (IST)

    खाजगी दूध उत्पादक संघांचा दूध उत्पादकांवर घाला

    दुधाच्या दरात मोठी घसरण

    दूध उत्पादक शेतकरी धास्तावला

  • 12 May 2023 05:37 PM (IST)

    CBI : समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ

    समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा

    एनसीबीच्या अहवालानंतर सीबीआयची मोठी कारवाई

    बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयचा छापा

  • 12 May 2023 05:27 PM (IST)

    The Kerla Story : पश्चिम बंगाल सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

    द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याने दाखल केली होती याचिका

    पश्चिम बंगाल सरकारची सिनेमावर बंदी

    या बंदीविरोधात निर्मात्यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

  • 12 May 2023 05:16 PM (IST)

    CM Eknath Shinde : संत चोखोबारायांचे मंदिराचे कलशारोहण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमुर्ती स्थापना आणि लोकार्पण

    बुलडाणा जिल्ह्यातील इसरुळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    इसरुळचा लवकरच तीर्थस्थळ म्हणून विकास करण्याची केली घोषणा

  • 12 May 2023 05:12 PM (IST)

    पुण्यात तापमानाचा पारा 42 अशांच्या वर

    राज्यातही उष्णता वाढणार हवामान खात्याचा इशारा

  • 12 May 2023 05:11 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस तर्फे "लेटर टू पीएम" आंदोलन

    ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पुण्यात काँग्रेसच आंदोलन

    भाजपा खासदार ब्रीज भूषणसिंह यांच्यावर कारवाई करावी या मागण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र

    पुण्यातील एफसी कॉलेज रोडवर काँग्रेस तर्फे लेटर टू पीएम आंदोलनाचे आयोजन

  • 12 May 2023 05:10 PM (IST)

    'कॅट'ने परमवीर सिंग यांची विभागीय चौकशी चुकीची ठरवत ती बंद करण्याचा निर्णय दिला - देवेंद्र फडणवीस

    सोबतच त्यांचं जे निलंबित केलं होतं ते सुद्धा मागे घेण्याचा निर्णय घेतला
     त्यानुसार महाराष्ट्र सरकारने निलंबनाचा निर्णय मागे घेतलाय
  • 12 May 2023 05:06 PM (IST)

    PM Narendra Modi : 12 वीच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

    सीबीएसईमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

    विद्यार्थी नव्हते परीक्षा योद्धा, पंतप्रधानांच्या शुभेच्छा खास अंदाजात

  • 12 May 2023 04:59 PM (IST)

    Twitter : महिलेच्या हाती लवकरच ट्विटरची कमान

    सहा आठवड्यात होणार खांदेपालट

    ट्विटरचे एलॉन मस्क यांनी केले जाहीर

    नवीन वारसदाराच्या नावाची रंगली चर्चा

    या महिलेचे नाव सर्वात आघाडीवर, वाचा सविस्तर 

  • 12 May 2023 04:58 PM (IST)

    उदयनराजे यांनी साताऱ्यात उद्योग वाढावेत यासाठी उद्योग परिषद नियोजनबद्ध आयोजित केली - नारायण राणे

    9 वर्षात मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले आहे

    मी टेक्निकल सेंटर साताऱ्याला देणार

    राजे आणि तरुणांनी उद्योग मागितल्यास देऊ

    पश्चिम भाग आर्थिक प्रगत झालेला दिसत नाही

    288 आमदार आहेत, त्यांचं मत घेईन, चर्चा करायला वेळ आहे का?

    सगळं चांगलं चाललेलं आहे

    ज्याला लोकांनी घरी बसवलं त्याने आराम करावे

    राऊत यांचे भांकीत एकही खरे ठरत नाही

    राऊत डिप्रेशनमध्ये गेलेत

    शिवसेनेला राऊत यांनी संपवलं

    राऊत सध्या बेकार आहे

    ठाकरे 2 तास मंत्रालयात आले

    ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या वर जावे

    ठाकरेंनी राजीनामा देऊन मूर्खपणा केला

    भाजपच मंगळसूत्र घातलं होतं आणि खुर्चीसाठी शरद पवारांचा हात धरला

    अजित दादा भाजपच्या संपर्कात होते हे वर नेत्यांना विचारेन

    पश्चिम महाराष्ट्रत बारसूचा काय संबंध

    पवारांनी त्या पुस्तकात ठाकरेंचं काही ठेवलं नाही

  • 12 May 2023 04:56 PM (IST)

    पुण्यात आम आदमी पक्षाचं आंदोलन

    पुणे महपालिकेच्या वाढीव मिळकतकरा विरोधात आप आक्रमक

    पुणे महापालकेसमोर घोषणाबाजी करत आपचं आंदोलन

    पुणेकरांकडून जमा केलेला वाढीव मिळकत कर वापस करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी

    नुकतीच राज्य सरकारकडून वाढीव 40 टक्के मिळकत कर रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता

    त्यानुसार ज्या पुणेकर आणि अधिकचा कर भरला होता, त्यांचा मिळकत कर परत देण्याची आपची मागणी

    पुणे महापालिकेने जलद गतीने कर वसूल केला

    पण अधिकचा मिळकत कर परत द्यायला पालिका दिरंगाई करत असल्याचा आपचा आरोप

  • 12 May 2023 04:55 PM (IST)

    महाराष्ट्राच्या राजकारण आणि पक्ष संघटनेवर चर्चा राहुल गांधींशी केलीय -  नाना पटोले

    येणाऱ्या कालावधीत कांग्रेस पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी रणनीती आखली

    राज्यपालांची भूमिका चुकीची होती

    संविधानिक व्यवस्थेला नष्ट करण्याचं काम भाजप करतेय

    भाजपचा खरा चेहरा सुप्रीम कोर्टाने समोर आणला

    सध्याचं सरकार असंविधानिक आहे. हे कोर्टाने सांगितलं, आम्ही पण तेच म्हणत होतो

    भाजप मध्ये नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा

    कोर्टाने स्पष्ट केलंय की सरकारचं बेसिक चुकीचे आहे

    अजित पवार म्हणाले अध्यक्ष न नेमून आम्ही चूक केली, त्यांनी चूक मान्य केलीय

    उपाध्यक्ष त्यांचेच होते. त्यांनी आमदारांवर कारवाई केली नाही

    अजित पवारांनी असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती

  • 12 May 2023 03:59 PM (IST)

    अपात्र ठरण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही जे केले नियमानुसार केलेला आहे- संजय शिरसाट

    सुप्रीम कोर्टाने आम्हाला अपात्र ठरवलं नाही त्यांनी सांगितले हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे येत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा

    यामुळे आमचं जे काही अपील आहे ते विधानसभा अध्यक्षकडे होईल आणि ते योग्य ते निर्णय देतील- संजय शिरसाट

    सुनील प्रभू यांच्या नियुक्ती बाबत बोलताना संजय शिरसाट यांनी न्यायालयाच्या आदेशावर भाषा करणे योग्य नाही

    मात्र या सर्वाचा निर्णय अध्यक्ष आपल्या दालनात किंवा विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशन भरून घेतील- संजय शिरसाट

  • 12 May 2023 03:54 PM (IST)

    मिरा भाईंदर: सफाई यंत्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

    मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात सफाई यंत्राचा लोकार्पण सोहळा संपन्न.

    आमदार गीता भरत जैन व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सफाई यंत्राचा लोकार्पण सोहळा पार पडला.

    महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजने अंतर्गत महानगरपालिकेस बॅटरी ऑपरेटेड मोटर सक्शन मशीन “गोब्ब्लर” (सफाई यंत्र)

    गोब्ब्लर खरेदी करण्यास 2 कोटी 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला.

    महानगरपालिकेच्या माध्यमातून 6 प्रभाग समित्यांना प्रत्येकी 2 “सफाई यंत्र” उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    सकाळी सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील, फुटपाथवरील कचरा स्वच्छ केल्यानंतर रस्त्यावर पुन्हा अस्वच्छता पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • 12 May 2023 03:50 PM (IST)

    नितेश राणे हा चिल्लर माणूस त्यांचे वडील कुठे कुठे जाऊन आले- अंबादास दानवे

    नितेश राणे हा चिल्लर माणूस त्यांचे वडील कुठे कुठे जाऊन आले

    त्यांनी 17 दार केले ते भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर पाळले जातात त्यांनी आम्हाला शिकवू नये

    तुम्हाला लाज वाटली पाहिजे आतापर्यंत निकाल ऐकून राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता

    अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते योग्य निर्णय देतील

  • 12 May 2023 03:38 PM (IST)

    अंबादास दानवे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

    त्यांनी रात्री तीन वाजता राष्ट्रवादीसोबत सोबत सत्ता स्थापन केली त्यांनी आम्हाला नैतिकता शिकू नये

    राजभवन येथे शपथ घेतली ती कोणती नैतिकता होती

    मेहबूबा मुफ्ती सोबत तुम्ही गेला, नितीश कुमार बरोबर सरकार स्थापन केले

    देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता शिकवू नये

  • 12 May 2023 03:29 PM (IST)

    अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

    अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली टीका, नैतिकतेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा

    एवढे मोठे मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही नैतिकता नाही का

    गद्दारी करून करून लोक गेले, आपल्या रक्तमासाची लोक आपल्या सोडून गेले त्या नैतिकेतून त्यांनी राजीनामा दिला

    उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला याचा कोणताही पश्चाताप होत नाही

    शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी, सत्ता शिवसेनेकडे येईल

  • 12 May 2023 03:26 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात बोगस खते , किटकनाशक विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

    खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या सूचना

    अल निनोचा परिणाम पाहता दुबार पेरणी करावी लागली तर बियाणांचा साठा उपलब्ध ठेवावाव

    पुणे जिल्ह्यात 2 लाख हेक्टर एवढं खरीपाचं क्षेत्र आहे

    33 हजार क्विंटलच्या मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे

    जिल्हा प्रशासनाची माहिती

  • 12 May 2023 03:19 PM (IST)

    परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

    अनिल देशमुखांवर केले होते गंभीर आरोप

    परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

  • 12 May 2023 03:12 PM (IST)

    शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना अटक

    नैना प्रकरणामध्ये पोलिसांनी घेतले ताब्यात

    पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात

    बाळाराम पाटील शेतकऱ्यांसोबत नैना प्रकल्पाला करत होते विरोध

    शेतकऱ्यांसह बाळाराम पाटील यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे

    गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलमधील नैना प्रकल्पाला शेकापचा विरोध आहे

  • 12 May 2023 02:59 PM (IST)

    जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचा गोळीबारात मृत्यू

    - जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार करण्यात आला.

    - तसेच हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात आवारे यांचा मृत्यू झाला.

    - त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.

    - या प्रकाराने खळबळ उडाली असून तळेगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

    - तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणले होते.

  • 12 May 2023 02:46 PM (IST)

    माढा लोकसभेतून लढण्याची तयारी - रामराजे नाईक निंबाळकर

    - विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रामराजे यांनी ललकारले आहे.

    - इथून पुढचा माढ्याचा खासदार हा वाड्यातीलच होणार , वाड्याबाहेरचा होणार नाही असे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

    - पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे.

    - याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील.

  • 12 May 2023 02:36 PM (IST)

    तुमच्या प्रश्नांची उत्तरे नाही, तरी 'गिरा तो भी टांग उपर', आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका

    - तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात? हे सरकार अवैध घोषित करण्यासाठी गेला होता ना? करू शकला का? तर उत्तर नाही.

    - तुम्ही कोर्टात गेला होता 16 आमदाराला अपात्र करण्यासाठी.. 16 आमदार अपात्र करू शकला का ? तर नाही.

    - तुम्ही न्यायालयात गेला होतात, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलण्यासाठी? तुम्ही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकला का? तर नाही.

    - तुम्ही कोर्टात गेला होतात राज्यपाल महोदयांनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत हे करण्यासाठी. मग तुम्ही राज्यपालांचा निर्णय बदलू शकलात का ? तर त्याचे उत्तर ही नाही असेच आहे.

    - तुम्ही कोर्टात गेला होता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवा हा निवाडा मागण्यासाठी, तुम्हाला सत्तेत बसवण्याचा निवाडा आला का? तर नाही.

    - तुम्हाला शिंदेंना अवैध ठरवायचं होतं म्हणून तुम्ही न्यायालयात गेलात तर सरकारला अवैध ठरवू शकलात का? तर नाही.

    - सलग सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही अशी आहेत. तुम्ही केलेली मागणी आणि कोर्टाकडून मिळालेले उत्तर हे नकारात्मक असल्यामुळे तुमचा सत्ता सरपटूपणा आता इथपर्यंत गेला की गिरा तो भी टांग उपर म्हणजेच उद्धव ठाकरेंचं धोरण यापेक्षा वेगळे काही नाही.

  • 12 May 2023 02:26 PM (IST)

    केंद्राविरोधात दिल्ली सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

    - दिल्ली विरुद्ध केंद्र या वादावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला.

    - मात्र, दिल्ली सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    - राज्य सरकारच्या बदलीच्या आदेशावर केंद्र सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला आहे.

    - सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने यावर सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

    - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपल्या निर्णयात पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था आणि जमीन याशिवाय इतर विभागांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार दिल्ली सरकारला असतील असे म्हटले आहे.

  • 12 May 2023 02:15 PM (IST)

    जे भाजपच्या मतावर निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा - श्रीकांत शिंदे

    - भाजप आणि शिवसेना युतीच्या मतांवर निवडून आले आहेत.

    - जे तिकडे १४ पंधरा जण आहेत त्यांनी राजीनामा द्यावा.

    - निवडणुकीला सामोरे जावं, लोकांना विचार तुम्ही आमच्या सोबत आहेत का ?

    - तुम्हाला तुमची मते किती आहेत ते कळेल.

    - टाईमपास करू नका, लवकर राजीनामा द्या

  • 12 May 2023 02:10 PM (IST)

    शिवसेना प्रमुखांच्या विचारांची ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा मिळाला - संजय शिरसाट

    - ज्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विचारांची गद्दारी केली त्यांना धडा मिळाला.

    - ज्या सल्लागाराने वाटोळे केले तेच त्यांना ब्रिफ करत होते.

    - तुम्हाला नैतिकतेवर बोलण्याचा काही अधिकार आहे का ?

    - शिवसैनिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला आहे.

    - आजची उद्धव ठाकरे यांची प्रेस यामधूनही तेच केले.

    - उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहेत.

  • 12 May 2023 01:54 PM (IST)

    ठाकरे गट लोकांची दिशाभूल करण्याचा काम करत आहे - श्रीकांत शिंदे

    सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत - श्रीकांत शिंदे

    जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरु - श्रीकांत शिंदे

    शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा

  • 12 May 2023 01:47 PM (IST)

    CBSE बोर्ड 12 वी निकालात मुलीच अव्वल

    CBSE बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर...

    यंदा 12वी मध्ये एकूण 87.23 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण...

    यंदा मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक...

    सीबीएसई बोर्डाच्या १२वीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण...

    निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी.

  • 12 May 2023 01:37 PM (IST)

    पुणे | वकिलीच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं स्वतःचं आयुष्य

    रॅगिंगच्या वादात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती

    राज गर्जे निधन झालेल्या विद्यार्थ्याचं नाव

    निरूपम जयवंत जोशी याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    9 तारखेची गोखलेनगरमधील हॉस्टेलवर घेतला गळफास ..

    विद्यार्थ्यांच्या वडिलांची डेक्कन पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

  • 12 May 2023 01:25 PM (IST)

    पुणे | गुरुवारी कोरेगाव पार्क परिसरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    पुणेकर उन्हाच्या झळांनी त्रस्त

    घराबाहेर पडताना नागरिक डोक्याला कापड बांधून पडतायेत बाहेर

    आजही जवळपास 40 अंश सेल्सिअसवर तापमान

  • 12 May 2023 01:18 PM (IST)

    सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    - परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला.

    - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

    - सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    - तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

  • 12 May 2023 01:17 PM (IST)

    राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर शहरात कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन, पक्ष बांधणीवर सर्वात जास्त भर

    राज ठाकरे कार्यशाळा पुढच्या महिन्यात मीरा भाईंदर याठिकाणी घेणार आहेत...

    येणाऱ्या काही दिवसांत निवडणुका आहेत, म्हणून सर्वांनी कामावर लागा.. राज ठाकरे

    लोकांना भेटा... लोकांची काम करा... राज ठाकरे याचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

  • 12 May 2023 12:57 PM (IST)

    कर्नाटकातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार ?

    - कर्नाटकातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने असणार ?

    - कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपात काटे की टक्कर,

    - कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी उद्या मतमोजणी,

    - उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी,

    - बहुतांश सर्व्हेत काँग्रेस एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा,

    - प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण

  • 12 May 2023 12:49 PM (IST)

    निकालामुळे सगळी जनता खुश आहे - बच्चू कडू

    निकालामुळे सगळी जनता खुश आहे...

    मी कधी मंत्रीमंडळात येईल हे मला सांगता येनार नाही..पण दिलेला शब्द पाळला जाईल..

    21 22 26 पर्यत  मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.जर आता विस्तार झाला नाही तर तो 2024 नंतरच होईल

  • 12 May 2023 12:48 PM (IST)

    उद्धव ठाकरेंवर बावनकुळे यांचं टीकास्त्र

    उद्धव ठाकरेंवर बावनकुळे यांच टीकास्त्र
    उद्धव ठाकरे केवळ राडोबा झालेत, लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही
     रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, ज्यांच्या ब्लडमध्ये विकास, दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही
    स्वतः शरद पावरांना वाटते की माझा निर्णय चुकला, महाविकास आघाडीचा नेता अशा व्यक्तीला बनवल जो आपला पक्ष संभाळू शकतं नाही
    त्यामुळे मला वाटतं उद्धव जीने आत्मपरीक्षण करावं
  • 12 May 2023 12:48 PM (IST)

     धावत्या टाटा इंडिगो कार ला लागली आग

     धावत्या टाटा इंडिगो कारला लागली आग,
    नागपूरच्या रामदास पेठ परिसरातील घटना,कारमधील कार चालक सुरक्षित,सुदैवाने जीव हानी नाही,अग्निशमन विभागाच्या 2 गाड्यांनी आगीवर मिळवले नियंत्रण,
    कारच्या इंजिन मधून अगोदर धूर निघाला व नंतर आगीत गाडीचा पुढील भाग जाळून राख
  • 12 May 2023 12:35 PM (IST)

    शैक्षणिक आणि सामाजिक विषयात लक्ष घालतो - यशवंतराव गडाख

    50 ट ते 60 वर्षांची राजकीय कारकीर्द माझ्यासमोर आहे, पण आता यापासून लांब आहे, शांत आहे. शैक्षणिक आणि सामाजिक विषयात लक्ष घालतो

    बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझी मैत्री होती, त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मी केले होते, विधानसभेला विचारणा झाली आमच्यासोबत राहाल का, मंत्रीपदासाठी नाही शंकरराव भेटून आले त्यांना छान वाटले मग मी उध्दव साहेबांशी बोललो मंत्रिपद द्या अथवा न द्या तुमच्या सोबत राहू, जुन्या लोकांना डावलून त्यांनी आम्हाला मंत्रिपद दिलं त्यामुळे मी शंकरराव यांना सांगितलं की आता उध्दव साहेब यांच्या सोबत होतो, आम्हालाही प्रलोभने होती पण आम्ही उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहिलो...

  • 12 May 2023 12:20 PM (IST)

    नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

    काही मिनिटां अगोदर जगातला सर्वात मूर्ख (संजय राऊतच्या भाषेत चु)संजय राऊत कालच्या न्यायालयाच्या निकालावर बोलला.

    नंगानाच याबाबद्दल कोणी बोलावं?कोणी विश्लेषण करावं....संजय राऊतनी?

    नंगानाच कशाला म्हणतात ते काही दिवसात लिंक दाखवतो.

    उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दोन अनिल यांचे आभार मानले.बरोबर आहे,यांच्या सारखी लोक आहेत म्हणून उद्धव ठाकरे संपलेला आहे.या दोंघांचा आणि संजय राऊत यांचा नागरी सत्कार करायला हवा.

    संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे. हातभर फाटल्यावर चेहरा कसा होतो तसा कालपासून झाला आहे.

    सरकार अजून भक्कम झालं आहे.अब तेरा क्या होगा संजय राऊत?जेलमध्ये जाण्याचे दिवस पुन्हा येणार.

    जेलमध्ये असताना बाथरूम साठी अन्य कैद्यांबरोबर भांडायचा.इतर कैद्यांनी जेलरकडे याची तक्रार केली होती.

    पत्राचाळ मधल्या मराठी माणसाचा शाप तुला लागणार.बॅग भरून ठेव.

    उद्धव ठाकरे ,संजय राऊत नैतिकतेची भाषा करतायत.....मला त्यांना विचारायचं आहे,शिवसेना अधिकृत ही शिंदे साहेबांकडे आहे.उबाठा हे नाव त्यांना तात्पुरत दिलं होतं.त्यांना वेगळं नाव आणि चिन्ह निवडावंच लागेल.

    राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाईव्ह केलं त्याची उद्धव ठाकरेंना आठवण करून देईन.....मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देतो अस म्हणाला होतात.मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिलेला नाही?तुमच्यात खरच नैतिकता असेल तर देऊन टाका आमदारकीचा राजीनामा.

    2014 ते 19 चा काळ आठवा.उद्धव ठाकरे सख्ख्या भावाची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे ते कोर्टात जाऊन बघा.

    महाराष्ट्राला सर्वात बेईमान माणूस कोण असेल तर तो उद्धव ठाकरे.आणि नैतिकतेची भाषा तुम्ही करता.

    काल नितीशकुमारजीन बरोबर लालूंचा मुलगा आलेला होता...ज्या लालूंनी संधी मिळेल तिथे बाळासाहेबांचा अपमान केला होता.हिंदुत्वाचा अपमान केला.तुमच्यात हिंमत असती तर नितीशकुमार आणि लालूंच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जायला हवं होतं,नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं.

    जगातला सर्वात नागडा माणूस....संजय राजाराम राऊत.ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झालास त्याचा पहिला राजीनामा दे.बघू तुझी नैतिकता.

    रोज लोक तुझ्यावर थूकुन जाता आहेत.रोज महाविकास आघाडीचे लोक टीका करता आहेत.

    तू पत्रकार आहेस का हे पाहिलं तपासलं पाहिजे.कुठल्या पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी असते?तू पत्रकार आहेस की दलाल हे सांग पहिला.

    जो बाळासाहेबांचा झाला नाही....तेव्हा बाळासाहेबांनी खासदारकी दिली नाही म्हणून 6 जून 1998 ला लोकप्रभा त हा बाळासाहेबांवर लेख लिहिला होता(लेख(कॉपी) दाखवत आहेत).

    8 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असा संजय राऊत आरोप करतोय.या बाप लेकांचे कपडे उतरून रस्त्यावर आणेन. असा संजय राऊत लिहितोय.

    उद्धव ठाकरेंनी तेव्हा राज्यपालांद्वारे(कोशारी) मोदी साहेबांना विनंती केली होती की मला आमदार करा.

    सरकार स्थिर आहे.

  • 12 May 2023 12:18 PM (IST)

    कल्याण शहाड परिसरातील धक्कादायक घटना 

    कल्याण शहाड परिसरातील धक्कादायक घटना
    पत्नी कामाला जाते म्हणून पतीने केले भर रस्त्यावर  पत्नीवर चाकूने  वार
    रंजीता शेट्टी असे पत्नीचे नाव असून तीन महिन्या पूर्वी शशिकांत शेट्टी यांच्या सोबत झाले होते लग्न
    पती सोबत भांडण होत असल्याने दोन दिवसापूर्वी रंजीता शहाड मध्ये आईकडे राहण्यास आली होती
    आज पहाटे साडेसात ते सातच्या दरम्यान कामावर जात असताना पतीने चाकूने रंजीता वर सहा  ते सात वार केले
  • 12 May 2023 12:10 PM (IST)

    निकालाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण..

    संजय राऊत PC..

    निकालाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण..

    जल्लोष करणारे हे नागडे करून विधान सभा अध्यक्षा कडे पाठवले..

    सरकार बेकायदेशीर आहे..

    व्हिप बेकायदेशीर..

    राज्यपालांनी संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर..

    एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड बेकायदेशीर..

    फुटलेला पक्ष हा मूळ पक्षावर दावा करू शकतं नाहीत..

    सर्वोच्च न्यायालयाचे आभार असून त्यांनी संपूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याचे ठरवले..

    ती महिन्यात निर्णय होईल..

    राहुल नार्वेकर मुलाखती देत असून ते घटना पदावर असून ते माध्यमाच्या समोर बोलतात..

    नार्वेकरांचा पक्ष बदलांचा इतिहास बघा..

    या राज्यातील पोलीस आणि प्रशासनास बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका..

    दादा भुसे हे मिस us ऑफ पॉवर वापरू नये..

    अडचणीत याल

    निर्णयावर संभ्रम हा भाजपाच्या सोशल मीडिया सेलवरून केलं जातं आहे..

    उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा नैतिकतेवर दिला आहे..

    पेढे वाटतंय वेड लागले की काय..

    90 दिवसात निर्णय घ्यावा लागेल..

    उद्धव ठाकरे यांनी भावनिक भूमिका होती म्हणून राजीनामा दिला होता..

    न्यायालयाच्या निर्णयाचे चुकीचं माहिती पोचवणे हि निर्ल्जपना आहे ..

    या प्रक्रियेत प्रधानमंत्री अडचणीत येतील..

  • 12 May 2023 12:09 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा - राज ठाकरे

    - मलाही कोर्टाच्या अनेक नोटीस येतात, ती भाषा वाचल्यावर लक्षात येत नाही की आपल्याला सोडलयं की अटक केली आहे.

    - आता ही कोर्टाने जो निर्णय दिला आहे. त्याचा धुरळा उतरला की नेमकं काय म्हटलं आहे ते कळेल.

    - सुप्रीम कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे.

    - सगळी प्रोसेस चुली पण मुख्यमनातरी यांनी राजीनामा द्ययल्या नको होता.

    - विधिमंडळाचा नाही तर बाहेरचा आहे तोच पक्ष.

    - निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. त्याचे काय होणार ?

  • 12 May 2023 12:09 PM (IST)

    मुंबईकरांकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले

    पावसाला अवघा महिना उरलेला असताना आता भाजपने मुंबईतील नाले सफाई दौरा आयोजित केलाय.. आजपासून भाजप मुंबई अध्यक्ष अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबईतील नालेसफाईची पाहणी सुरू करत आहेत. आज आशिष शेलार खार, सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी या परिसरातील नाल्यांची पाहणी करणार आहेत..

    - मुंबईकरांकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले

    - आज पालिकेकडून दावे केले जात आहेत ते कंत्राटदाराच्या जीवावर केले जात आहेत

    - 280 कोटीच्या वरचे कंत्राटदार, उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या कंत्राटदार आहेत, ते गाळे काढल्याची चुकीची माहिती देत आहेत

    - आकडे फेकले जात आहेत, दुर्लक्ष केले जात आहेत, निष्काळजीपणे काम केले जात आहे

    - आदित्य ठाकरे यांची भाषा, कंत्राटदारांची वकिली करणारी भाषा, कंत्राटदार आजही काम करतात, मात्र तुमच्या जवळच्या कंत्राटदारांकडून केली जाणारी सफाई नाले तुंबणार नाहीत का याची ग्वाही देतात का ?

    - उद्धव ठाकरे स्वतःच्या पक्षातील आमदार, मंत्री वाचवू शकले नाहीत, भावाचे, वाहिनीचे प्रेम वाचवू शकलो नाहीत...

    - नैतिकता,मैत्री आणि मर्द या शब्दांवर उद्धव ठाकरे यांचे प्रेम आहे, आदित्यचा विजय आमच्यामुळे आधी त्याला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला सांगा आणि मर्द आणि हिंमत असेल तर निवडणुकीत उतरा

    - 'सत्तासरपटूपणा' उद्धव ठाकरे करत आहेत

    - कोर्टात सरकार अवैध , आमदार अपात्र करण्यासाठी गेलेला मात्र तसे झाले नाही

    - कोर्टकडून त्यांच्यासाठी नकारात्मक निर्णय आला, यामुळे गिरा तो भी टांग उपर अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका

  • 12 May 2023 12:08 PM (IST)

    महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत गरजू महिलांना यंत्र सामग्री वाटप सोहळा

    आमदार प्रसाद लाड यांचा पुढाकार

    बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू व विधवा महिला लाभार्थ्यांना लघु व्यवसायाकरिता शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप, इत्यादि प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेषनिधी वाटप सोहळा दिनांक 13 मे रोजी, सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथे संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते हा निधी वाटप सोहळा संपन्न होणार आहे.

  • 12 May 2023 11:52 AM (IST)

    सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांना 3 महिन्यात निर्णय देणे आवश्यक- संजय राऊत

    संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षाना इशारा

  • 12 May 2023 11:42 AM (IST)

    सत्ता हाच नार्वेकरांचा आधार त्यांना विचारधारा नाही- संजय राऊत

    बेकादा सरकारचा मृत्यू अटळ, हे सरकार तीन महिन्यात जाणार- संजय राऊत

    नैतीकतेच्या आधारे उद्धव ठकरेंनी मुख्यमंत्री पद सोडले- संजय राऊत

  • 12 May 2023 11:36 AM (IST)

    कोर्टाच्या निकालाचे उध्दव ठाकरेंनी योग्य विश्लेषन केले- संजय राऊत

    कोर्टाने व्हीप बेकायदेशीर ठरवलं जातच आमचा विजय- संजय राऊत

    बेकायदेशीर सरकार वाचल अस म्हणणे सर्वोच्च न्यायालचा अवमान - संजय राऊत

  • 12 May 2023 11:25 AM (IST)

    राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

    सुप्रीम कोर्टात आता 4 जुलैला सुनावणी होणार
    ठाकरे सरकारने आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली होती

    तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी यादी मंजूर केलेली नव्हती

  • 12 May 2023 11:19 AM (IST)

    CBSE च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

    CBSC बोर्डाचा बारावीचा निकाल यंदा 87.33 टक्के लागला आहे

  • 12 May 2023 11:09 AM (IST)

    ठाकरेंनी राजकारण सोडून विकासावर बोलावं - चंद्रशेखर बावनकुळे

    मुख्यमंत्री असतानाही ठाकरे विकासावर बोलत नव्हते -चंद्रशेखर बावनकुळे

    फक्त राजकारण सुरू आहे विकासाची चर्चा कुठेही नाही- चंद्रशेखर बावनकुळे

  • 12 May 2023 11:03 AM (IST)

    राज्यपाल पदावर बसलेल्यांनी आपल्या पक्षाचा विचार सोडायला हवा- अजित पवार

    विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता- अजित पवार

    नैतीकतेवर शिंदे फडणवीस राजीनामा देतील हे स्वप्नही पाहू नका- अजित पवार

  • 12 May 2023 10:50 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    १६ मे पर्यंत राज ठाकरेंचा ठाणे जिल्ह्याचा दौरा

  • 12 May 2023 10:36 AM (IST)

    चिखली / बुलढाणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर

    - बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरुळ-मंगरुळ येथे संत चोखोबाराय यांच्या मंदिराचे करणार लोकार्पण

    - पालकमंत्री गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे देखील राहणार उपस्थित

    - विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यासाठी काय घोषणा करणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

  • 12 May 2023 10:23 AM (IST)

    पक्षांतर बंदी कायद्याला काही अर्थ राहिला आहे का , असा प्रश्न निर्माण झाला आहे - अजित पवार

    नैतिकतेच्या आधारे शिंदे-फडणवीस राजीनामा देतील असं वाटत नाही

  • 12 May 2023 10:21 AM (IST)

    आमची चूक झाली, विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता - अजित पवार

    नाना पटोलेंनी राजीनामा देणं ही आमची चूक होती

    पटोलेंच्या राजीनाम्यावरू अजित पवारांचे वक्तव्य

  • 12 May 2023 10:15 AM (IST)

    अध्यक्ष नार्वेकर बेकायदेशीर, याबद्दल कोर्टात दाद मागणार - उद्धव ठाकरे

    १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्या, ठाकरे गट नार्वेकरांना लिहीणार पत्र

  • 12 May 2023 10:13 AM (IST)

    कायद्याच्या चौकटीत पक्षांतर करायचं हे नार्वेकरांना माहीत आहे

    उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना लगावला टोला

    विधानसभा अध्यक्षांनी गद्दारांवर तातडीने निर्णय घ्यावा

  • 12 May 2023 10:08 AM (IST)

    राज्यपाल नियुक्त करण्यासाठी नियमावली ठरवावी - उद्धव ठाकरे

    जोपर्यंत नियमावली तयार होत नाही तोपर्यंत राज्यपाल पद रद्द करा

    राज्यपालांचा घरगड्यासारखा वापर होत असेल तर संस्था बरखास्त करा

  • 12 May 2023 10:06 AM (IST)

    देशात कोरोनाचे 1580 नवीन रुग्ण, 18 हजार सक्रिय रुग्ण

    देशात कोरोना विषाणूचे 1580 नवीन रुग्ण आढळले आहेत.

    गेल्या 24 तासांत 3167 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 18009 सक्रिय प्रकरणे आहेत.

  • 12 May 2023 10:03 AM (IST)

    डबल इंजिनमधलं एक पोकळ इंजिन बाजूला जाणार - उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात

    शिंदे सरकारला तातडीने पायउतार होण्यास मोदींनी भाग पाडावं

  • 12 May 2023 10:00 AM (IST)

    अजय चौधरी गटनेते- परब

    अजय चौधरी यांची गटनेतापदी निवड कोर्टाने योग्य ठरवली

    विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे.

    कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहे

  • 12 May 2023 09:55 AM (IST)

    सुनील प्रभूंचे व्हिप लागू होतील- अनिल परब

    सुनील प्रभूंचे व्हिप सर्व सदस्यांना लागू होतात.

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

    एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही रद्द केली आहे.

    अजय चौधरी यांची गटनेतापदी निवड कोर्टाने योग्य ठरवली

  • 12 May 2023 09:51 AM (IST)

    पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार- उद्धव ठाकरे

    अध्यक्षांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायलयात गेले होतो

    त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ

    मग सरकारची होणारी बदनामीला ते जबाबदार असणार

  • 12 May 2023 09:47 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्ला

    विश्वासघातकी लोकांचा सोबत राहून मला मुख्यमंत्रीपद नको होते

    यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला- उद्धव ठाकरे

    आताच्या बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे

    आता आपण निवडणुकीला सामोरे जावू या, हे मी आव्हान देतो

    जनतेचे न्यायालय सर्वोच्च आहे

  • 12 May 2023 09:44 AM (IST)

    राज्यामध्ये बेंबदशाही- उद्धव ठाकरे

    राज्यात बेबंदशाही राबवण्याचा प्रयत्न- उद्धव ठाकरे

    काल गद्दारांनी फटाके वाजवले, पण का वाजवले, हे कळत नाही.

    शिंदे गटाचा जल्लोष कशासाठी

    सर्वाच्च न्यायालयाने त्यांना चांगलाच फटका दिला आहे

    राज्याची बदनामी थांबली पाहिजे

  • 12 May 2023 09:38 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यात येत आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरूळ-मंगरूळ येथे संत चोखोबाराय यांच्या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे देखील उपस्थित असणार आहे.

  • 12 May 2023 09:21 AM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.

    सविस्तर वाचा

  • 12 May 2023 09:16 AM (IST)

    सहा म्हशींचा मृत्यू

    पुणे जिल्ह्यातील मावळ येथे सहा म्हशींचा मृत्यू

    आंदर मावळातील नागाठली गावात म्हशींच्या गोठ्याला लागली आग

    आगीत सहा म्हशींचा जीव गुदमरून मृत्यू झालाय

    शेतकरी रामदास खांडभोर यांचे लाखो रुपयांचे नुकसान

    खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तहसीलदार यांना पंचनामा करण्याचे दिले आदेश

  • 12 May 2023 09:08 AM (IST)

    वीज चौरीचे गुन्हे दाखल

    अमरावती शहरातील 882 ग्राहकांनी केली वीज चोरी

    वर्षभरात अनेकांनी केले मिटरमध्ये छेडछाड

    महावितरणने केला 3 कोटी 53 लाखांचा दंड

    ५३ प्रकरणात ग्राहकांवर वीज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल

  • 12 May 2023 09:02 AM (IST)

    तापमानात मोठी वाढ

    राज्यासह देशभरात तापमानात गेल्या चार दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. राज्यात प्रथमच मे महिन्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. त्याचवेळी पुणे, पिंपरी चिंचवडमधील तापमानाने उच्चांक गाठला आहे.

    सविस्तर वाचा

  • 12 May 2023 08:56 AM (IST)

    नवी दिल्ली | 12 विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्याप पर्यंत करता आलेली नाही

    ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती

    ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली नाही

    सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवीन यादी पाठवली

    आधीची यादी बदलण्यात आली

    याचिकाकर्ते सुनिल मोदी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

    त्यांच्या मते उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादी दिली तीच कायम ठेवावी

  • 12 May 2023 08:47 AM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकचा ब्रेकफेल झाल्यानं अपघात 

    बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला

    पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात झाला हा अपघात

    सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

    ट्रक चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी

  • 12 May 2023 08:44 AM (IST)

    Suryakumar Yadav IPL 2023 : हीच कमजोरी सूर्यकुमार यादववर पडू शकते भारी

    Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्या खूप भारी खेळताय, पण एक कमजोरी सगळा खेळ बिघडवेल. सूर्या सारखा फलंदाज खूप खास आहे. तो बिनधास्त खेळतो. पण एक कमकुवत बाजू आहे. आकडेच ही गोष्ट सांगून जातात. वाचा सविस्तर....

  • 12 May 2023 08:43 AM (IST)

    Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार यादवला चेल्यापासून धोका, 30 लाखाच्या बॉलरसमोर 33.75 कोटीचा बॅट्समन फेल

    Suryakumar Yadav IPL 2023 : मुंबई इंडियन्सने ज्या प्लेयर्सवर पाण्यासारखा पैसा खर्च केलाय, त्यांचीच तो सहजतेने शिकार करतो. गुजरात टायटन्सने या प्लेयरला बेस प्राइसला विकत घेतलं होतं. वाचा सविस्तर....

  • 12 May 2023 08:36 AM (IST)

    इलॉन मस्क यांनी ट्विटरचं सीईओ पद सोडलं

    इलॉन मस्क यांनी केली ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा

    नव्या सीईओ येत्या 6 आठवड्यांत होणार नोकरीवर रूजू

    इलॉन मस्क यांनी ट्विट करत दिली माहिती

    मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून करणार काम

  • 12 May 2023 08:22 AM (IST)

    मुंबईतील वरळी परिसरात राजन दास नावाच्या व्यक्तीला काठ्या आणि दगडांनी मारहाण

    सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना वरळी पोलिसांनी केली अटक

    आरोपीचे पीडितेसोबत वैयक्तिक वैर असल्याचं निष्पन्न

    आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल

  • 12 May 2023 08:08 AM (IST)

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज मीरा भाईंदर आणि वसई विरार दौरा

    मनसैनिकांसोबत राज ठाकरे घेणार बैठक

    मीरा भाईंदर आणि वसई विरारमधील मनसेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी

  • 12 May 2023 08:01 AM (IST)

    पुणे | अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

    सकाळपासून कार्यकर्ते कामानिमित्त अजित पवारांच्या भेटीला

    बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार घेत आहेत कार्यकर्त्यांची भेट

  • 12 May 2023 07:56 AM (IST)

    पुण्यातील लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी सुरू

    महापालिकेतील अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने मागवली

    पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने जिल्हा निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे

    यासाठी महापालिकेकडूनही आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे

    पोटनिवडणूक जाहीर झाली नसली, तरी ती जाहीर झाल्यास गडबड होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया सुरू

    जिल्हा निवडणूक विभागाने यासाठी, महापालिकेत कार्यरत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांची माहिती महापालिका प्रशासनाकडून मागविली आहे

    विद्यमान लोकसभा सभागृहाची मुदत संपण्यास अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक

    29 मार्च रोजी गिरीश बापट यांचे झाले होते निधन त्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे

  • 12 May 2023 07:32 AM (IST)

    शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता नाही, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे स्पष्टीकरण

    ठाकरे गटाने बजावलेला व्हीप सभागृहाला लागू होणार नाही

    ठाकरे गटाने बजावलेला व्हीप सभागृहाबाहेरचा आणि खासगी पातळीवरचा आहे

    त्यामुळे ठाकरे गटाचा व्हीप सभागृहाला लागू होणार नाही

    विधानसभेचे अध्यक्ष सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची शक्यता नाही

    16 आमदार अपात्र होउ शकत नसल्याचा हरिभाऊ बागडे यांचा दावा

    विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दाव्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता

  • 12 May 2023 07:20 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील भोकर रोडवर एका ट्रकने बुलेटला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू

    खैरगांव - आमराबाद फाट्याजवळ हा अपघात झालाय

    खरबी गावातील लग्न समारंभ उरकून संदीप आणि राहुल काळे हे चुलत भाऊ नांदेडकडे परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला

    यातील दोन्ही मयत हे नांदेड शहरातील चौफाळा भागातील रहिवासी होते

  • 12 May 2023 07:19 AM (IST)

    बुलढाणा पोलिसांकडून एकाच दिवशी तब्बल 79 जुगार अड्ड्यावर छापे

    छाप्यात 85 आरोपींना अटक, तर 96 दारू अड्ड्यावरही केली कारवाई

    आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, बुलढाणा पोलिसांची धडक कारवाई

    विविध पोलिस स्टेशन हद्दीत सुरू आहेत अवैध धंदे

    जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांत उडाली एकच खळबळ

  • 12 May 2023 07:17 AM (IST)

    सेफ्टी टँकच्या सफाईचे काम करत असताना 5 मजुरांचा मृत्यू

    परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली घटना

    मारुती राठोड यांच्या शेत शिवारात आखड्यावर सेफ्टी टँकचे सफाईचे काम करत असताना रात्री घडला प्रकार

  • 12 May 2023 07:14 AM (IST)

    उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधणार; 'सुप्रीम' निकालावर काय भाष्य करणार?

    राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे

    या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी काल प्रतिक्रिया व्यक्त केली होती

    आमच्याच प्रतोदचा व्हीप लागू होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते

    त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

    सकाळी 9.30 वाजता उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद होणार आहे

Published On - May 12,2023 7:08 AM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.