AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: “राज साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक पूर्ण खचलाय”, निलेश लंकेंच्या 1 कोटीच्या दाव्यावर मनसे पदाधिकारी भावनिक

पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यानंतर मनसैनिक पवार खचल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO: राज साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक पूर्ण खचलाय, निलेश लंकेंच्या 1 कोटीच्या दाव्यावर मनसे पदाधिकारी भावनिक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 31, 2021 | 12:44 AM
Share

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यानंतर मनसैनिक पवार खचल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ जारी करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय. “तुमचा मनसैनिक पूर्णपणे खचलाय. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढेही झुकणार नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. आता याला तुम्हीच उत्तर द्या,” अशी मागणी अविनाश पवार यांनी केलीय. तसेच मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याला आमदार निलेश लंके जबाबदार असतील, असाही इशारा दिलाय (Parner MNS Activist emotional video to Raj Thackeray over 1 crore defamation notice by MLA Nilesh Lanke).

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. तसेच राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. त्यामुळे आता अहमदनगरच्या या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या स्तरावर उमटण्याची शक्यता आहे.

“साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे, आता सहन होत नाही”

आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”

“मनसे कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या”

“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या. आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.

“मला आणि माझ्या पक्षाला आईवरुन शिवीगाळ, माझी चूक काय?”

अविनाश पवार म्हणाले, “माझी चूक काय आहे. त्यांनी मला आईवरुन शिव्या दिल्या, माझ्या पक्षाला भंगार म्हणाले. चुका यांनी करायच्या आणि पैसे माझ्याकडे मागायचे. मी त्याच मतदारसंघातील माणूस आहे. आमदारांना हजार लोक मानत असतील तर मला 10-20 तर मानत असतील की नाही. या आमदाराला मनसैनिकांनीच मतदान केलंय. त्याच मनसैनिकांबद्दल हे असं वागत असतील तर हे आमदारांना शोभतं का? माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही. सुपा पोलीस स्टेशन, पारनेर पोलीस आणि तहसीलदार यांना मी लेखी निवेदन दिलंय. त्यांनी माझी कोणतीही चौकशी केली नाही.”

“मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं, तर याला आमदार निलेश लंके जबाबदार”

“आमदार निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरंवाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल. हेच आमदार चुका करुन माझी बदनामी करत आहेत. माझी राज साहेबांना विनंती आहे. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढे झुकणारा नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. मी पूर्ण खचलेलो आहे, आता याला उत्तर तुम्हीच द्या. माझे आई वडील वयस्कर आहेत. त्यांना टेंशन घेऊन काही झालं, तर याला पूर्णपणे निलेश लंके जबाबदार असतील. माझी कळकळीची विनंती आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.

निलेश लंकेच्या वकिलांची भूमिका काय?

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”

हेही वाचा :

बनावट क्लिप तयार करुन बदनामी केल्याचा आरोप, आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटीची नोटीस

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं; कोविड सेंटरची व्यवस्था पाहून जयंत पाटील भावूक

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक

व्हिडीओ पाहा :

Parner MNS Activist emotional video to Raj Thackeray over 1 crore defamation notice by MLA Nilesh Lanke

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं