मोठ्याने बोलू नका, इतरांना त्रास होतो, डॉक्टरने हटकताच नातेवाईकाचा चाकूहल्ला

एकीकडे डॉक्टर कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. (Patient relative stabbed doctor in nanded)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:09 PM, 21 Apr 2021
मोठ्याने बोलू नका, इतरांना त्रास होतो, डॉक्टरने हटकताच नातेवाईकाचा चाकूहल्ला
नांदेडमध्ये डॉक्टरांवर चाकूहल्ला

नांदेड : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे डॉक्टर कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. नांदेडमध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांवर हल्ला केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Patient relative stabbed doctor in nanded)

डॉक्टरांकडून सूचना 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याच रुग्णालयात डॉक्टरांवर जीवघेणा चाकू हल्ला झाला आहे. या डॉक्टराने रुग्णाच्या नातेवाईकांना मोठ्याने बोलू नका. त्यामुळे इतरांना त्रास होतो, अशी सूचना दिली होती.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मात्र त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकाला राग अनावर झाला. तो नातेवाईक बाजूला असलेला चाकू घेऊन डॉक्टरांच्या दिशेने धावत गेला. मात्र त्याचवेळी उपस्थितीतांनी त्याला अडवल्याने अनुचित प्रकार टळला. ही सर्व घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

आरोपीला अटक

दरम्यान या प्रकारानंतर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Patient relative stabbed doctor in nanded)

 

संबंधित बातम्या : 

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी

VIDEO | लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, बुलडाण्याच्या ठाणेदाराची सटकली

Video : कोण म्हणतं देवदूत नसतो? अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली, पुढे काय घडलं ते बघा…