राखीसाठी पुण्यावरुन बहीण आली, साडी आणायला गेलेला होमगार्ड भाऊ परतलाच नाही!

प्रशांत गोरे हा बारामती तालुक्यातील मासाळवाडी इथला रहिवासी होता. तो वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंतर्गत होमगार्ड या पदावर कार्यरत होता. रक्षाबंधननिमित्त त्यांची बहीण राखी बांधण्याकरिता पुण्याहून आली होती.

राखीसाठी पुण्यावरुन बहीण आली, साडी आणायला गेलेला होमगार्ड भाऊ परतलाच नाही!
Baramati Prashant Gore death

पुणे : देशभरात रविवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा उत्साह होता. बहीण-भावाच्या या उत्सवादरम्यान बारामतीत हृदयद्रावक घटना घडली. बहिणीसाठी साडी आणण्यासाठी गेलेला भाऊ परतलाच नाही. 25 वर्षांचा भावाला रस्त्यातच चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील मासाळवाडी इथं ही हृदयद्रावक घटना घडली. प्रशांत गोरे असं या तरुण भावाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

प्रशांत गोरे हा बारामती तालुक्यातील मासाळवाडी इथला रहिवासी होता. तो वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंतर्गत होमगार्ड या पदावर कार्यरत होता. रक्षाबंधननिमित्त त्यांची बहीण राखी बांधण्याकरिता पुण्याहून आली होती. बहिणीने राखी बांधली. मात्र तिला ओवाळणी काही दिली नव्हती. त्यामुळे प्रशांत तिला ओवाळणी म्हणून साडी आणण्यासाठी मोरगाव या ठिकाणी जात होता. एका दुकानात प्रशांत थांबला. त्याचवेळी अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला.

आसपास असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ मोरगाव येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. बहिण भावाचे अतूट नातं असलेल्या रक्षाबंधना दिवशीच, अशा हृदयद्रावक घटनेमुळे बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये ऐन रक्षाबंधनादिवशी तरुणीची आत्महत्या

18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव भागात उघडकीस आली आहे. स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून तिने आयुष्य संपवलं. मात्र मोबाईलवर स्पीकर सुरु करुन गाणे ऐकता ऐकता केलेल्या या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

नागपुरातही विद्यार्थ्याची आत्महत्या

दुसरीकडे, मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे.

संबंधित बातम्या 

मोबाईल स्पीकरवर गाणं लावून राहत्या घरात गळफास, नाशकात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या  

आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाची आत्महत्या 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI