5

पुणे-बंगळुरु हायवे जड वाहनांसाठी खुला, तर मुंबई-गोवा महामार्गावरही ठरावीक वाहतूक सुरु

तुफान पावसाने बंद झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती.

पुणे-बंगळुरु हायवे जड वाहनांसाठी खुला, तर मुंबई-गोवा महामार्गावरही ठरावीक वाहतूक सुरु
Pune Banglore Highway Kolhapur
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 1:59 PM

कोल्हापूर/रायगड : तुफान पावसाने बंद झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती. अखेर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहने पुढे सोडण्यात आली. तर तिकडे कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेला ब्रिटिशकालीन पुन्हा भराव टाकून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल दुरुस्थ करण्यात आला.

कोल्हापुरात पाणी ओसरण्यास सुरुवात

दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील पूल सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अत्यावश्यत सेवेतील कर्मचारी, साहित्यांची वाहतूक करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे कोल्हापुरातील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती. अखेर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली. आज प्राथमिक चाचणीनंतर जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील आणि जड वाहन महामार्गावरून मार्गस्थ केली. महामार्ग बंद असल्यामुळे गेल्या चार दिवसापासून हजारो वाहन आणि त्यांचे चालक प्रवासी अडकून पडले होते. आज महामार्ग सुरू होताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झाली असून सध्या फक्त पेट्रोल, डिझेल, गॅस त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुढे सोडल जातं आहे. दरम्यान पाणी कमी होत असलं तरी त्याचा प्रवाह अद्याप कायम असल्याने छोटी वाहने आणि दुचाकी वाहनांना मात्र अद्याप या मार्गावरून सोडलं जात नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक

चिपळूणजवळ मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. बहादूर शेख येथील वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल पुन्हा रिपेअर करण्यात आला. पाच दिवसांनी पुन्हा एकदा वाहतूक सुरू झाली. 8 फूट उंचीच्या वाहनांना सद्या परवानगी दिली आहे.

VIDEO : पुणे-बंगळुरु महामार्ग चार दिवसांनी सुरु

संबंधित बातम्या  

अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच

(Pune Bangalore Highway traffic resume from Kolhapur Maharashtra also Mumbai Goa highway starts from chiplun rain and landslide update)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?