टेम्पो-ट्रेलरच्या मधे स्वीफ्टचा चक्काचूर, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील घटना

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मल्टीव्हेहीकलचा भीषण अपघात झालाय. सहा गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पुण्याहुन मुबंईकडे जाताना खोपोली हद्दीतील बोरघाटामध्ये सहा वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला.

टेम्पो-ट्रेलरच्या मधे स्वीफ्टचा चक्काचूर, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील घटना
Mumbai-Pune Express way Accident


रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मल्टीव्हेहीकलचा भीषण अपघात झालाय. सहा गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पुण्याहुन मुबंईकडे जाताना खोपोली हद्दीतील बोरघाटामध्ये सहा वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. यामध्ये कोबंडी वाहुन नेणाऱ्या टेम्पो आणि ट्रेलरमध्ये स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात स्वीफ्टकारमध्ये असलेले दोन प्रवाशी अडकले होते. रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. कारमधील अडकलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आले असून पुढील प्रक्रीयेकरीता खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले. तर टेम्पोमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामुळे मुबंईकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखुन धरली होती. डेल्टा फोर्स, आयआरबी यत्रंणा, देवदूत, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे कार्यकर्ते बचाव कार्यात मदतीला होते.

भरधाव वेगात दुचाकी, थेट दुभाजकावर आदळल्याने दोघांचाही मृत्यू

पिंपरी चिंचवड येथे अंगाचा थरकाप उडवणारा एक अपघात झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना आकुर्डी येथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली आहे. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येते झाला. अपघात झालेल्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. ही दुचाकी भरधाव वेगात जात होती. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीनेही थेट पेट घेतला. आर्यन परमार आणि श्वेता गजबे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

नाशिकमध्ये थरारक अपघात

दसऱ्याच्या दिवशी मुलीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला होता. रंगनाथ खालकर असे मृताचे नाव होते, तर त्यांच्या गंभीर जखमी मेहुण्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . हिंगणवेढे परिसरात 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार महादू काळू टिळे  आणि रंगनाथ मुरलीधर खालकर हे दुचाकीवरून दसऱ्यादिवशी मुलीला तिच्या सासरी भेटायला गेले होते. खालकर यांनी आपल्या मुलीची भेट घेतली आणि ते गावी निघाले होते. त्यांची दुचाकी (एम.एच. 15 एफ.जी. 3711) हिंगणवेढे येथून जात होती. त्यांच्या समोरून एक कार येत होती. कार कोटमगावडे जात होती. या कार (एम. एच. 15 ए. एच. 4175) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली होती. स्पार्किंगमुळे दुचाकीने पेट घेतला होता.

संबंधित बातम्या :

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

Video | भरधाव वेगात दुचाकी, थेट दुभाजकावर आदळल्याने दोघांचाही मृत्यू, थरकाप उडवणारा अपघात कॅमेऱ्यात कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI