“वकील, अधिकाऱ्याला अटक आणि आरोपी फरार, हे पहिल्यांदा घडतंय”, राम शिंदेंचा अनिल देशमुखांना टोला

| Updated on: Sep 07, 2021 | 4:13 PM

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी ईडी चौकशीवरुन राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. वकील, पोलीस अधिकाऱ्याला अटक होते आणि आरोपी फरार आहे, हे पहिल्यांदा घडतंय, असं म्हणत राम शिंदे यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावला.

वकील, अधिकाऱ्याला अटक आणि आरोपी फरार, हे पहिल्यांदा घडतंय, राम शिंदेंचा अनिल देशमुखांना टोला
Follow us on

अहमदनगर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी ईडी चौकशीवरुन राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. वकील, पोलीस अधिकाऱ्याला अटक होते आणि आरोपी फरार आहे, हे पहिल्यांदा घडतंय, असं म्हणत राम शिंदे यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावला. तसेच देशमुखांनी स्वतःहून ईडी चौकशीसाठी हजर राहावं, असं मत व्यक्त केलं. ते अहमदनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

राम शिंदे म्हणाले, “राज्यातील संपूर्ण कायदा सुव्यवस्था ढासाळली आहे. केंद्रीय मंत्र्यावर एखादी केस नाशिकमध्ये दाखल करायची, गुन्हा घडलाय महाडमध्ये, स्थानबद्ध रत्नागिरीत करायचं असं सुरू आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करतात, दुसरीकडे माजी गृहमंत्र्याला लुक आऊटची नोटीस आहे, माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही. खरंतर अनिल देशमुख यांनी स्वतः ईडीच्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. त्यांना 5-5 ईडीच्या नोटीस गेलेल्या आहेत, तरीही ते हजर होत नाहीत. अशाप्रकारचं विश्वास नसलेलं, गैर विश्वासानं स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्रात सुरू आहे. परंतू त्यांना ईडीला सामोरं जावं लागेल.”

“देशमुखांना पोलिसांच्या तेल लावलेल्या काठीची भिती वाटते की काय?”

“पहिल्यांदाच बघतोय की वकिलाला आणि पोलीस अधिकाऱ्यालाच अटक झालीय आणि आरोपी फरार आहे. दुसरीकडे हे केंद्रीय मंत्र्याला अटक करत आहेत. अशा परिस्थितीत अनिल देशमुख यांनी स्वतः हजर झालं पाहिजे. नसेल तर पोलिसांनी ते कुठं आहे हे माहिती आहे. ते कोरोना लॉकडाऊनच्या काळात ते पोलिसांना तेल लावून काठ्या ठेवा म्हटले होते. त्यांना कदाचित त्याच काठीची भिती वाटते की काय माहिती नाही,” असंही राम शिंदे यांनी नमूद केलं.

परळीत करुणा शर्मांबाबत घडलेला प्रकार कटकारस्थान, राम शिंदेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप

राम शिंदे म्हणाले, “भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अस असताना परळीत जे घडलं आणि सोशल मीडियावर जे पाहायला मिळालं ते चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे ते समोर यायला हवं. शेवटी कुणाला अडवून, कुणाला दडवून काम होणार नाही. परंतु राज्यातील एखाद्या मंत्र्यानं अशा अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली तर त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.”

“हा कट आहे. इतक्या मोठ्या गर्दीत एक माणूस चालू गाडीची डिक्की उघडतो. त्याच्या हातातील वस्तू ठेवतो, दुसऱ्या बाजूचा माणूस डिक्की बंद करतो. त्यासाठी पोलीस त्याच्या शेजारी उभा असतो. या परिस्थितीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. यात मोठं कटकारस्थान आहे. त्यामुळे याची चौकशी होऊन सत्य जगासमोर आलं पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ नये. शेवटी हे राज्य कायद्याचं आहे. मंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे त्याप्रमाणे वागून न्याय झाला पाहिजे,” असंही राम शिंदे यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी, भाजप प्रवक्त्यांचं आव्हान

अनिल देशमुख जनता आणि तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत?, राष्ट्रवादीने खुलासा करावा; भाजपची मागणी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस, देश सोडण्यास मज्जाव

व्हिडीओ पाहा :

Ram Shinde criticize Anil Deshmukh over ED look out notice