अनिल देशमुख जनता आणि तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत?, राष्ट्रवादीने खुलासा करावा; भाजपची मागणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.

अनिल देशमुख जनता आणि तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत?, राष्ट्रवादीने खुलासा करावा; भाजपची मागणी
अनिल देशमुख, शरद पवार

मुंबई : महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. (NCP should clarify about Why Anil Deshmukh come infront of public and investigating agencies?, BJP’s demand)

उपाध्ये यांनी सांगितले की, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, आपण सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत, ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत? याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने करावा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.

उपाध्ये यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक व राजकीय कार्यक्रम थांबविले पाहिजेत अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. मात्र गणेशोत्सवासारखा सण तोंडावर आल्यावरच मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्ये का करावीशी वाटतात याचे आश्चर्य वाटते. मंदिरे, चित्रपटगृहे वगळता राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. फक्त मंदिरात जाण्याने कोरोना पसरतो का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.

इतर बातम्या

कोथळा काढणं म्हणजे नक्की काय?, चंद्रकांतदादांना पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू, त्यांनी वाचावं; राऊतांचा खोचक टोला

अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?; राऊतांचा हल्लाबोल सुरूच

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा, वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान; 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा

(NCP should clarify about Why Anil Deshmukh come infront of public and investigating agencies?, BJP’s demand)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI