Palghar | पालघरमध्ये जाळ्यात अडकले दुर्मिळ मासे, मच्छीमारांनी केली सुटका

तारापूर येथे समुद्रकिनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या मासेमारी जाळ्यात अडकले होते. मच्छीमारांनी जाळे तोडून या माशांना जीवनदान दिले. यावेळी दुर्मिळ असलेल्या या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

Palghar | पालघरमध्ये जाळ्यात अडकले दुर्मिळ मासे, मच्छीमारांनी केली सुटका
पालघरमध्ये दुर्मिळ मासा सापडला

पालघर : माच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉइझ (Finless Porpoise Fish) या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले हे दोन मासे तारापूर (Tarapur) येथे समुद्रकिनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या मासेमारी (Fishing) जाळ्यात अडकले होते. मच्छीमारांनी जाळे तोडून या माशांना जीवनदान दिले. यावेळी दुर्मिळ असलेल्या या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

दोन्ही माशांची सुखरूप सुटका केली

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या तारापूर येथील जगदीश विंदे यांनी समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाळे लावले होते. मात्र काही काळानंतर जाळ्यात मच्छीमाराला दुर्मिळ असे दोन मासे आपली सुटका करण्यासाठी धडपड करत असल्याचं लक्षात आलं . वेळीच विंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मासेमारीचे जाळे तोडत या दोन्ही माशांची सुखरूप सुटका केली. दिसायला अगदीच दुर्मिळ आणि काही प्रमाणात व्हेल माशांसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही माशांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुखरूप पाण्यात नेऊन सोडून दिले.

पाहा व्हिडीओ :

खोल समुद्रात आढळतो हा दुर्मिळ मासा 

जगदीश शिंदे यांच्या जाळ्यात अडकलेले हे दुर्मिळ मासे फिनलेस पोरपॉइझ प्रजातीचे होते. हा दुर्मिळ मासा भारताच्या समुद्र किनारपट्टीपासून सुमारे शंभर ते दोनशे किलोमीटरपर्यंत खोल समुद्रात आढळून येतो. थंडीच्या काळात हे मासे उष्ण कटिबंधीय समुद्रात येत असतात. पकडलेल्या या माशांची लांबी जवळपास दोन मीटर तसेच वजन साधारणतः 35 ते 40 किलोपर्यंत होते. फिनलेस पोरपॉइझ हे मासे दुर्मिळ असून त्यांचे जतन आणि संवर्धन आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

हात असलेला मासा पाहिलात का?, ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर आढळला दुर्मिळ हॅन्डफिश

Fish rain | इकडे मार्गशीर्ष संपला, तिकडे माशांचा पाऊस पडला? कसा? समजून घ्या!

Published On - 11:56 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI