AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात असलेला मासा पाहिलात का?, ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर आढळला दुर्मिळ हॅन्डफिश

ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर माशाची एक दुर्मिळ प्रजात आढळून आली आहे. तस्मानियाच्या नैऋत्य किनार्‍याजवळील खोल समुद्रात हा मासा आढळून आला आहे. या माशाला गुलाबी हॅन्डफिश म्हणून ओळखले जाते.

हात असलेला मासा पाहिलात का?, ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर आढळला दुर्मिळ हॅन्डफिश
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 2:28 PM
Share

तस्मानिया : ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर माशाची एक दुर्मिळ प्रजात आढळून आली आहे. तस्मानियाच्या नैऋत्य किनार्‍याजवळील खोल समुद्रात हा मासा आढळून आला आहे. या माशाला गुलाबी हॅन्डफिश म्हणून ओळखले जाते. हा मासा एंग्लर फिश कुळातला सदस्य आहे. याचे आतापर्यंत समुद्रात केवळ पाच वेळाच दर्शन झाल्याची नोंद आहे. हा मासा 1999 साली होबार्टच्या तस्मान द्वीपकल्पांवर आढळून आला होता. त्यानंतर तो तब्बल 22 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये तस्मानियाच्या नैऋत्य किनाऱ्यावर आढळून आला आहे.

माशाची जात नामशेष होण्याच्या मार्गावर

या दुर्मिळ माशाच्या अस्थित्वाबाबत शास्त्रज्ञांकडून शोध सुरू होता. याचदरम्यान हा मासा आढळून आला आहे. हा मासा नामशेष झाल्याचे यापूर्वी तज्ज्ञांनी म्हटले होते. मात्र हा मासा पुन्हा एकदा आढळून आला आहे. याबाबत बोलताना स्ट्रीप ट्रम्पटर यांनी म्हटले आहे की, गुलाबी हॅन्डफिश ही माशाची अंत्यंत दुर्मिळ अशी प्राजात आहे. हा मासा एंग्लर फिश कुळातला सदस्य आहे. माशांची ही प्रजात अत्यंत लाजाळू असते, त्यामुळे हे मासे खोल समुद्रात राहाणेच पसंत करतात. मात्र विविध कारणांमुळे या माशांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली. आज माशांची ही प्रजात नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या माशांचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.

120 मीटर खोल समुद्रात आढळतो हॅन्डफिश

गुलाबी हॅन्डफिशचे खोल समुद्रामध्ये वास्तव्य असते. या माशाचा रंग हा गुलाबी असतो, तसेच त्याच्या दोन्ही बाजूचा भाग हा हातासारख्या दिसतो म्हणून या माशाला गुलाबी हॅन्डफिश असे म्हणतात. हा मासा समुद्रात 120 मीटर खोलीवर आढळून येतो. हा मासा अंत्यंत लाजाळू असल्याने हा तसा लगेच दृष्टीस पडत नाही. या जातीचे काही मोजके मासे जगात शिल्लक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान या आगळ्यावेगळ्या प्रकारच्या माशावर संशोधन सुरू असल्यी माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या

VIDEO : वरमाला घालताना नवरदेवाने दिली वेगळीच पोज! व्हिडिओवर हजारो तरुणी फिदा…

Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल

राजाला राणी सव्वाशेर, 3 बॉडीगार्डसोबत संबंधांचा धुराळा, 5 हजार कोटीच्या घटस्फोटाची ‘आतली’ गोष्ट

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.