‘या चिमन्यांनो परत फिरा’, भास्कर जाधव यांचं शिंदे गटाला माघारी परतण्याचं आवाहन?

भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत 'या चिमन्यांनो परत फिरा', असं म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांचा शपथविधी हा एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून पार पाडला गेला, असंही वक्तव्य त्यांनी केलं.

'या चिमन्यांनो परत फिरा', भास्कर जाधव यांचं शिंदे गटाला माघारी परतण्याचं आवाहन?
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 9:28 PM

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील करुन घेताना त्यांना मंत्रिपदं किती द्यायची, किती महामंडळं द्यायची, याच्या चर्चेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना सामावून घेतलं की नाही? याबाबत माझ्या मनात शंका आहे. ते शपथ घ्यायला जात असताना एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं का? ते सुद्धा बाहेर आलं पाहिजे”, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

“वैधानिक कामकाजानुसार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना भेटलं पाहिजे. त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं पाहिजे. या लोकांना मंत्रिपदाची शपथ आहे. राज्यपालांची वेळ घ्यावी लागते. पण अशी कुठलीही प्रक्रिया झालेली माझ्या निदर्शनात आली नाही”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

‘एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून…’

“पहिल्यांदा अजित पवार आणि त्यांचा गट राजभवानवर गेले. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर गेले. तास-दोन तासात हा शपथविधी पार पडला. त्यामुळे याबाबतची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून झाली असावी, अशी मला शंका आहे”, असं मत भास्कर जाधव यांनी मांडलं.

हे सुद्धा वाचा

‘शिंदे गटातील आमदार शंभर टक्के अस्वस्थ’

“मी परवा एकनाथ शिंदे यांचा आदर राखून एक मुलाखत दिली आहे. भाजपने तुम्हाला इशारा दिला आहे की, तुमची गरज संपली आहे. तुम्हाला राहायचं असेल तर राहा नाहीतर जायचंय तर जा. त्यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन गोळाबेरीज केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मनात अस्वस्थता असली काय आणि नसली काय, त्याला फार काही महत्त्व आहे, असं मला वाटत नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“या सगळ्या घटनाक्रमात अजित पवार यांना पक्षात घेणं, त्यांना किती मंत्रिपदं देणं, त्यांना किती महामंडळ देणं, त्यांना कधी शपथ देणं या सगळ्या प्रक्रियेत माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहितीसुद्धा नसावं किंवा त्यांना विश्वासात सुद्धा घेतलेलं नसावं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्वभाविक आहे, स्वत: एकनाथ शिंदे अस्वस्थ नसतील, कारण ते स्वत:पूरतं त्यांचं स्थान बळकट मानत असतील. पण त्यांच्याबरोबर गेलेले लोक हे शंभर टक्के अस्वस्थ होणारच. त्यांनी झालंच पाहिजे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“वर्षभर त्यांच्यातील बऱ्याचशा आमदारांना आम्ही मंत्री करु म्हणून सांगितलं, पण अजित पवार यांच्यासह 9 लोकं गेली. त्या सर्वांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. पण यांच्यापैकी एकालाही मंत्रिमंडळात घेतलं नाही. कोण अस्वस्थ होणार नाही? कुणाला विश्वास राहील? म्हणून ते अस्वस्थ राहणं हे स्वभाविक आहे”, असंही जाधव म्हणाले.

‘या चिमन्यांनो परत फिरा रे’, भास्कर जाधवांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली

“मी एवढंच सांगेन, शेवटी काल हे गेलेले लोकं एकेकाळचे आमचे सहकारी होते. आम्ही काही वर्ष एकमेकांबरोबर कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात नाही म्हटलं तरी सहानुभूती आहे. कोण परत येईल किंवा कोण परत येणार नाही, याबाबत बोलणार नाही. कारण तो माझा अधिकार नाही. पण एकदा कधीतरी आमच्यासारखे लोक शिवसेनेतून बाहेर पडलो होतो तेव्हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या चिमन्यांनो परत फिरा रे असं आवाहन केलं होतं. मला शिवसेना प्रमुखांची आज आठवण येतेयं”, अशी आठवण भास्कर जाधव यांनी सांगितली.

“ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडण्यात आला होता त्याचदिवशी मी त्यांना आवाहन केलं होतं की, एकनाथराव कोण कोणाविरोधात लढणार आहे, कोण कुणाला रक्तबंबाळ करणार आहे, कोण कुणाचं रक्त सांडणार आहे आणि कोण मजा बघणार आहे?”, असं जाधव म्हणाले.

“शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक लढवले जातील. भारतीय जनता पक्ष ही सगळी मजा बघेल. म्हणून ही संधी देऊ नका. कुठे थांबायचं याचा वेळीच विचार करा. मला असं वाटतं की त्या गोष्टीला एक वर्ष झालं आणि आज अजित पवार यांना सरकारमध्ये घेऊन एकनाथ शिंदे यांना मी जे बोललो त्याची आठवण नक्कीच येईल. पण मी पुन्हा एकदा सांगतो की, देर है लेकीन मगर अंधेर नहीं”, असं सूचक वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.