सांगलीमध्ये चौथ्या टप्प्याचे कडक निर्बंध लागू, सांगलीत काय सुरु? काय बंद?

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निर्बंध आणखी कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

सांगलीमध्ये चौथ्या टप्प्याचे कडक निर्बंध लागू, सांगलीत काय सुरु? काय बंद?
सांगली

सांगली: सांगली जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निर्बंध आणखी कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. रस्त्याच्याकडील खाद्यपदार्थ विक्री आणि आठवडी बाजारावर बंदी घातली आहे. 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात चौथ्या स्तराचे लागू असलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

सांगलीचा पॉझिटिव्हिटी रेट दहा पेक्षा जास्त

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या आता पुन्हा वाढू लागलेली आहे, रोजचा आकडा हा हजारांच्या घरात पोहचत आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निबंध कडक करण्यात आले आहेत.पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्याच्या पुढे आणि वीस टक्क्यांच्या आत असल्याने सध्या सांगली जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश आहे.

चौथ्या स्तराचे निर्बंध

सांगली जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत चौथ्या स्तराचे निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत.मात्र, रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लागू असलेले निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातल्या रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे,त्याचबरोबर शहरातील रस्त्यांवर विनापरवाना विक्री व्यवसायालाही बंदी घालण्यात आली आहे.

आठवडी बाजारावर निर्बंध

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं शहर आणि ग्रामीण भागात आठवडी बाजारांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्याबाबत पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी संबंधित पालिका प्रशासनाला केल्या आहेत.सध्या सकाळी 7 ते 4 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकान व भाजी मंडई या ठिकाणी विक्रीस परवानगी आहे.

सांगली कोरोना / म्युकर अपडेट

सांगली जिल्हा कोरोना अपडेट

13 जुलै रोजी आढळलेले कोरोना रुग्ण 948

म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 314 , नवे रुग्ण 2

कोरोनामुळे 12 रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 4307 वर

अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 10100 वर

तर उपचार घेणारे 950 जण कोरोना मुक्त

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 144762 वर

जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 159169 वर

इतर बातम्या:

केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे, तो मोठ्या प्रमाणावर वापरला पाहिजे : उद्धव ठाकरे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज, 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण