सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?
Sangli flood
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 8:19 AM

सांगली : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान आणि मोठी अशा एकूण 32 हजार 3 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आतापर्यंत किती गाव अंशत आणि पूर्णत: बाधित?

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 13, अंशत: बाधित 90 अशी एकूण 103 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीणमध्ये 3 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी 5 गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील 2 गावे पूर्णत: आणि 29 गावे अंशत: अशी एकूण 31 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत: आणि 8 गावे अंशत: अशी एकूण 9 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात 1 गाव पूर्णत: तर 18 गावे अंशत: अशी एकूण 19 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 6 गावे पूर्णत: आणि 17 गावे अंशत: अशी एकूण 23 गावे बाधित आहेत.

किती नागरिकांचे स्थलांतरण?

स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 13 हजार 449 कुटुंबामधील 65 हजार 135 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 55 कुटुंबातील 4 हजार 451 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर अपर सांगली ग्रामीण मधील 6 हजार 67 कुटुंबातील 24 हजार 806 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 7 हजार 918 कुटुंबातील 39 हजार 590 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 3 हजार 724 कुटुंबातील 19 हजार 60 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 1 हजार 286 कुटुंबातील 6 हजार 565 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर पलूस तालुक्यातील 7 हजार 585 कुटुंबातील 37 हजार 350 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

अनेक जनावरांचे स्थलांतरण

यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 296, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 952, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 129, वाळवा क्षेत्रातील 8 हजार 145, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 677, शिराळा तालुक्यातील 3 हजार 814, पलूस तालुक्यातील 8 हजार 990 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

मदतीचे निकष काय?

तर सांगलीतील पुरामुळे जिल्ह्यात 13 लहान/मोठी जनावरे, 3 शेळ्या, 19 हजार 360 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. त्यांना निकषानुसार देय मदत 3 लाख 87 हजार रूपये इतकी आहे. यामध्ये गाय/म्हैस 30 हजार रूपये, लहान रेडके/वासरे 16 हजार रूपये, शेळी/मेंढी 3 हजार रूपये व कोंबड्या 50 रूपये प्रति कोंबडी परंतु 5 हजार रूपये प्रति कुटुंब मर्यादा असा निकष आहे.

(Sangli flood migration of 1 lakh 96 thousand 957 affected persons)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा फटका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे : सामना

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसचा टोला

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.