वारे पठ्ठे हो… यात्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी चक्क बोली लागली; घसघशीत रक्कम मोजल्यावर चर्चा तर होणारच!

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील केवड गावात चक्क ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी बोली लागली. एका शेतकऱ्याने नारळ फोडण्याचा मान मिळावा म्हणून या बोलीत भाग घेतला आणि तो मानकरीही ठरला आहे.

वारे पठ्ठे हो... यात्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी चक्क बोली लागली; घसघशीत रक्कम मोजल्यावर चर्चा तर होणारच!
senior citizenImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 10:40 AM

सोलापूर : मानपानासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. गावात आपली वट हाय आणि आपण कसे तालेवार आहोत हे दाखवण्यासाठी लोकांचा आटापिटा असतो. सोलापुरातही काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला. चक्क यात्रेतीला ऑर्केस्ट्राचा मानाचा नारळ फोडण्यासाठी बोली लागली. किमतीवर किमती वाढल्या. अन् एका पठ्ठ्याने चक्क नारळ फोडण्यासाठी 55 हजार रुपये मोजले. त्यामुळे गावातच काय पंचक्रोशीत त्याची चर्चा होणार नाही तर नवलचं.

माढा तालुक्यातील केवड गावात ही घटना घडली. भगवान लटके यांनी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी चक्क 55 हजाराची बोली लावली. सर्वात मोठी बोली लावल्यानंतर त्यांना नारळ फोडण्याचा मान मिळाला आहे. केवडचे ग्रामदैवत श्री.काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ही बोली लावल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मानपानासाठी कोण कुठल्या स्तराला जाऊ शकतो हे काय सांगता येत नाही. राजकीय पद असो अथवा दुसरा एखादं पद मिळवण्यासाठी हौशी लोक करोडो रुपये खर्च करताना समाजात पहायला मिळतात.

हे सुद्धा वाचा

यात्रा जत्रांचा हंगाम सुरू

सरपंच पद, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आतापर्यंत आपण बोली लागलेली पाहिली असेल मात्र सोलापुरातील माढ्याच्या केवड गावात झालेल्या बोलीची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या महाराष्ट्र भरातील ग्रामीण भागात यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कुठे ऑर्केस्ट्रा होत आहे. तर कुठे तमाशे होत आहे. कुठे नृत्याचे कार्यक्रम होत आहे तर कुठे मैदानी खेळांच्या स्पर्धा पार पडत आहेत. गावकऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.

अन् गावकऱ्यांनी जल्लोष केला

केवड गावात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा ठेण्यात आला आहे. या ऑर्केस्ट्राचे उद्घघाटन करण्यासाठी अर्थात नारळ फोडण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील काळ भैरवनाथ मंदिरातच बोली लावली. बोलीत ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी तब्बल 55 हजार रुपये मोजण्यात आले. भगवान नरहरी लटके हे यावेळी मानकरी ठरले. लटके हे शेतकरी आहेत. त्यांनी बोली जिंकताच गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. काही गावकऱ्यांनी तर लटके यांना खांद्यावर उचलून जल्लोषही केला. नारळ फोडण्याचा क्षण काही सेंकदाचा असणार आहे. मात्र मानपानासाठी ग्रामीण भागातील मंडळी आजही किती अट्टाहास करतात याचंच हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

बोली लागलेलं पहिलं गाव

ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यासाठी बोली लागलेले सोलापूर जिल्ह्यातील केवड हे राज्यातील पहिलं गाव ठरलं आहे. गावकऱ्यांनी या लिलावाचा व्हिडीओही तयार केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे. त्यावर लोकांच्या मार्मिक आणि विनोदी प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, शुक्रवारी भगवान लटके यांची वाजतगाजत मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर लटके यांच्या हस्ते ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.