VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनीच सोमय्यांना दारुगोळा पुरवला? कदमांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Sep 21, 2021 | 12:56 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. (shivsena leader ramdas kadam first reaction on vaibhav khedekar allegations)

VIDEO: अनिल परबांच्याविरोधात रामदास कदमांनीच सोमय्यांना दारुगोळा पुरवला? कदमांची पहिली प्रतिक्रिया
Ramdas Kadam
Follow us on

रत्नागिरी: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. (shivsena leader ramdas kadam first reaction on vaibhav khedekar allegations)

रामदास कदम यांनी मीडियाशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रत्नागिरी परिषदेतील खेडचे क वर्ग नगरपालिकेतील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावाची शहानिशा केली, सुनावणी घेतली आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. खेडेकर हे कोर्टात गेले होते. न्यायालयामधून त्यांनी चार आठवड्याची स्थिगिती घेतली. त्यानंतर ते प्रचंड बिथरले. त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला आहे.

सोमय्यांचं थोबाडही पाहिलं नाही

अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितलं.

मी कशाला सरकार पाडू?

रामदास कदम सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा बिनबुडाचा आरोपही खेडेकर यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र रामदास कदमला ओळखतो. रामदास कदम हा कडवा सैनिक आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. एक गोष्ट पुन्हा सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीत मीच पत्रकार परिषद घेऊन यापुढे कोणतंही पद घेणार नाही, अशी घोषणा केली होती. तेव्हा मंत्रीपद मिळण्याचा प्रश्नच येत नाही. नाराज असण्याचाही प्रश्नच नाही. मीच कोणतंही पद घेणार नसल्याचं सर्वात आधी सांगितलं होतं. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे? तसं असतं तर मी इथे आलोच नसतो, असं सांगतानाच सरकार पाडणं म्हणजे मी माझ्या पायावर धोंडा मारून घेणं एवढं मला कळतं ना. सरकार पडलं तर नुकसान माझं होईल. मी कशाला सरकार पाडू. पण ज्याला अक्कल नाही. ज्यांची अकलेची गाठ नाही. आपण कुणावर बोलतो, काय बोलतो यांचं ज्यांना भान नाही, असे लोक बिनबुडाचा आरोप करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मानहानीचा दावा दाखल करणार

वैभव खेडेकर यांनी निखालस खोटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे. माझी वकिलाशी चर्चा झाली आहे. 50 कोटीचा की 10 कोटीचा की 100 कोटीचा याचा निर्णय घेणार आहे. हा सगळा प्रकार उचलली जीभ लावली टाळ्यालाचा आहे. काहीही आरोप केले जात आहेत, हे मी होऊ देणार नाही. कोणत्या परिस्थितीत खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार आहे,
असंही त्यांनी सांगितलं.

आरोपांना उत्तर द्यायला नेते सक्षम

अनिल परब आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप होत आहेत. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता ज्यांना ज्यांना अडचण आहे ते उत्तर देतील. ज्यांच्यावर आरोप झाले ते उत्तर देण्यास सक्षम आहेत. तो त्यांचा भाग आहे, असं ते म्हणाले. तसेच कोण दबंग आहे? कोण खिशात आहे? कोण अभंग आहे? कोण अपंग आहे? हे माझ्या सारख्या माणसानं बोलणं योग्य नाही, असा चिमटा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. (shivsena leader ramdas kadam first reaction on vaibhav khedekar allegations)

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांनी वात पेटवली त्या नेत्यांचं काय झालं?; सहा नेत्यांचे सहा घोटाळे

अतिनैराश्यातून अनंत गीते बेभान, शरद पवारांवरील टीकेनंतर सुनील तटकरे आक्रमक

उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडलेय, विशेष अधिवेशन बोलवा, राज्यपालांचा आणखी खरमरीत पत्र

(shivsena leader ramdas kadam first reaction on vaibhav khedekar allegations)