किरीट सोमय्यांनी वात पेटवली त्या नेत्यांचं काय झालं?; सहा नेत्यांचे सहा घोटाळे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. सोमय्यांनी या प्रकरणी ईडीकडे तक्रारीही केल्या आहेत. (Kirit Somaiya put up front against maha vikas aghadi leaders)

किरीट सोमय्यांनी वात पेटवली त्या नेत्यांचं काय झालं?; सहा नेत्यांचे सहा घोटाळे
political leader
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 12:12 PM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उठवली आहे. सोमय्यांनी या प्रकरणी ईडीकडे तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली असून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यापूर्वीही सोमय्या यांनी राज्यातील सहा नेत्यांवर आरोप केले होते. या आरोपांचं काय झालं? त्याचा घेतलेला हा आढावा. (Kirit Somaiya put up front against maha vikas aghadi leaders)

कृपाशंकर यांच्यावर आरोप

सोमय्या यांनी सर्वात आधी बॉम्ब टाकला तो तत्कालीन काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्यावर. सोमय्यांनी कृपशांकर यांचा थेट झारखंडची माजी मुख्यमंत्री मधू कोडांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा हा आरोप होता. सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी 2009मध्ये थेट कंपनी अफेयर्स खाते आणि ईडीकडे तक्रार केली. मात्र, 7 जुलै 2021मध्ये सिंग भाजपमध्ये आले. त्यानंतर या आरोपावर कुणीही वाच्यता केली नाही. सिंग हे भाजपचे मुंबईचे उपाध्यक्ष असून आगामी महापालिका निवडणुकीत सिंग यांचा भाजपला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप

सोमय्यांनी आरोप केलेलं आणि गाजलेलं प्रकरण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा. सोमय्यांनी थेट राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणात शेल कंपन्यांच्या मार्फत शेकडो कोटींचं मनी लँडरिंग केल्याचा दावाही त्यांनी केला होता. सोमय्यांच्या आरोप आणि तक्रारीनंतर 2016 मध्ये या प्रकरणी छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळांना अटक झाली होती. अटकेनंतर भुजबळ सुमारे 18 महिने तुरुंगात होते. सध्या सत्र न्यायालयाने भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्त केलं आहे. ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.

अजित पवारांवर आरोप आणि क्लीन चिट

सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर आरोप केला होता. त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 800 कोटीच्या मनी लँडरिंगचा आरोप केला होता. या प्रकरणी सोमय्यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफए कन्स्ट्रक्शन कंपनीतून पैसे वळवण्यात आल्याचा आरोप पवारांवर करण्यात आला होता. मात्र, मधल्या काळात अजित पवार यांच्यासोबत भाजपनं 80 तासाचं सरकार स्थापन केलं. त्याच काळात अजित पवारांना एसीबीनं क्लीन चीट दिली होती. सध्या पवार महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री आहेत.

आरोपानंतर पाचपुते भाजपमध्ये

सोमय्या यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे तेव्हाचे दुसरे नेते बबनराव पाचपुतेही अडचणीत आले होते. 2015 मध्ये भरभक्कम परतावा देण्याच्या नावाखाली राज्यात 26 पॉन्झी स्कीम्स चालवून त्यामाध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. पाचपुतेंमुळेच हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यात पाचपुतेंचा हात असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. 2014 च्या निवडणुकीआधीच बबनराव पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.

राणेंवर आरोप आणि भाजप प्रवेश

त्यानंतर सोमय्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्यावरही आरोप केला होता. ही 2017ची घटना. सोमय्यांनी राणेंवर 300 कोटींच्या मनी लँडरिंगचा आरोप केला होता. अविघ्न रिअल इस्टेटचे कैलाश अग्रवाल यांच्या कंपनीशी हातमिळवणी करून राणेंनी 300 कोटी रुपये रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये वळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राणेंनी काँग्रेस सोडून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. नंतर हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर भाजपने राणेंना राज्यसभेवर पाठवलं. सध्या राणे केंद्रात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री आहेत.

गावितांवर गंभीर आरोप, नंतर भाजपमध्ये

सोमय्या यांनी आणखी एक माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप केला होता. 2004 ते 2012 या काळात आदिवासी विकास खात्यातील विविध सरकारी योजनांमध्ये 6 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा आरोप होता. गंभीर तक्रारीनंतरही 2009 पासून गावितांची चौकशी पेंडिंग ठेवल्याबद्दल सोमय्यांनी तेव्हाच्या आघाडी सरकारला धारेवर धरले होते. 2014 च्या निवडणुकीआधी विजयकुमार गावित भाजपात दाखल झाले. त्यांना तिकीटही मिळालं आणि त्यांची मुलगी दोनदा खासदार म्हणून निवडूनही आली. त्यानंतर गावितांवर पुन्हा आरोप झाले नाहीत. (Kirit Somaiya put up front against maha vikas aghadi leaders)

संबंधित बातम्या:

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी नको: सुधीर मुनगंटीवार

2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, चंद्रकातदादांची धमकी, ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

(Kirit Somaiya put up front against maha vikas aghadi leaders)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.