2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, चंद्रकातदादांची धमकी, ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 21, 2021 | 9:56 AM

आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यांच्या याच धमकीला काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, चंद्रकातदादांची धमकी, 'फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू' पटोलेंचं प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us

मुंबई : आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यांच्या याच धमकीला काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्यांनी काही केलं नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मात्र आता  फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार असल्याचा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिद घेऊन घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उलट चंद्रकांतदादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर होती पण मी ती नाकारल्याने माझ्यावर ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला. मुश्रीफांच्या प्रेसनंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफांचा दावा खोडून काढताना कायदेशीर लढाईला तयार रहा, असा इशार दिला. तर फक्त आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी त्यांनी काँग्रेसला दिला.

चंद्रकांतदादांच्या धमकीला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही

चंद्रकांतदादांच्या धमकीनंतर नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. नाना पटोले म्हणाले, “भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत नाही. किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत. काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही. आमच्या मंत्र्याची चूक नसल्याने घाबरण्याची गरज नाही”

फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, “कॅबीनेटमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होऊन फडणवीसांच्या काळातल्या अनेक फाईल्स तयार आहेत. त्या आता काढल्या पाहिजेत, आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असं नाना पटोले म्हणाले.”

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसचीही नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

(Congress Nana Patole reply BJP Chandrakant patil )

हे ही वाचा :

शिवसेना, राष्ट्रवादीच नव्हे दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा; काँग्रेसचे दोन नेते कोण? सस्पेन्स वाढला

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI