AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना, राष्ट्रवादीच नव्हे दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा; काँग्रेसचे दोन नेते कोण? सस्पेन्स वाढला

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (chandrakant patil)

शिवसेना, राष्ट्रवादीच नव्हे दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा; काँग्रेसचे दोन नेते कोण? सस्पेन्स वाढला
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 12:13 PM
Share

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bjp leader chandrakant patil reply to hasan mushrif to his allegations)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

ते दोन नेते कोण?

पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुश्रीफ यांना ऑफर नव्हती

चंद्रकातदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, टीव्ही 9 ला सोबत घ्यायचं, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची. मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असंही ते म्हणाले.

पॅनिक होऊ नका, शांत डोक्याने काम करा

आरोप झाले म्हणून मुश्रीफ यांनी पॅनिक होऊ नये. त्यांनी शांत डोक्याने काम करावं. कायद्याची लढाई कायद्याने लढावी. गुद्द्यावर येऊ नका. कारखान्यातील गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या कोणत्या? या कंपन्या कुठे आहेत? याची माहिती द्या. विषयांतर करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. मुश्रीफांनी आता ड्रामा बंद करावा. ईडीची लवकरच नोटीस निघणार आहे, त्यासाठी एखादा चांगला वकील बघावा, असंही ते म्हणाले. (bjp leader chandrakant patil reply to hasan mushrif to his allegations)

संबंधित बातम्या:

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचा पलटवार

सोमय्यांच्या टार्गेटवर ठाकरेंचे बंगले; अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार

(bjp leader chandrakant patil reply to hasan mushrif to his allegations)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.