सिंधुदुर्गला दिलासा, रुग्णसंख्येत घट, जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लागू

सिंधुदुर्गला दिलासा, रुग्णसंख्येत घट,  जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लागू
Corona Update

राज्यातल्या 8 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 6.55 आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात प्रादुर्भाव झाला असला तरी भयंकर परिस्थिती ही दुसऱ्या लाटेत ओढवली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 11, 2021 | 7:07 PM

सिंधुदुर्ग: राज्यातल्या 8 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 6.55 आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात प्रादुर्भाव झाला असला तरी भयंकर परिस्थिती ही दुसऱ्या लाटेत ओढवली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दररोज 500 पेक्षा पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते तर दररोजच्या मृत्यूची संख्या ही 15 च्या वरच होती. प्रशासनकडून कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले जात होते. (Sindhudurg Corona update corona virus cases decrease from five july)

5 जुलैनंतर कोरोना रुग्णसंख्येत घट

तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्याला जणू कोरोनाने पोखरून काढले होते. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ही नेहमी पांच हजारच्या पुढेच होती. ही स्थिती अगदी पाच दिवसांपर्यंत अशीच होती. मात्र 5 जुलैनंतर या सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट व्हायला सुरवात झाली आहे. त्याचबरोबर जून महिन्याच्या अखेर पर्यंत रोज मिळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येतही घट होण्यास सुरवात झाली आहे.

जून महिन्यांपर्यंत रोजचे 500 च्या रुग्ण आढळत होते मात्र जुलै महिन्यांपासून यात घट होऊन ही संख्या खाली यायला सुरवात झाली। सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी हॉटस्पॉट जिल्ह्यात सिंधुदुर्गची नोंद झाली आहे. सध्या कोरोनाच्या नियमात जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली असून सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने उघड़ी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, विकेंड लॉकडाऊन जिल्ह्यात तसच ठेवण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 44483 एकूण रुग्ण आढळले असून 39491 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1115 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3875 सक्रीय रुग्ण आहेत.

मागील पांच दिवसांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

दिनांक  पॉझिटिव्ह  रुग्ण  मृत्यू       सक्रीय रुग्ण 10 जुलै     254                 8              3875 9              256                 6              3932 8               275                 1              3935 7               310                 6              4595 6               178                 8              4726

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी काही कमी होताना दिसत नाही. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला 400 च्या खाली उतरत नाही. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट वाढतोय. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यातील स्टेज चार मध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 8.27 टक्के आहे. लांजा रत्नागिरी आणि संगमेश्वर हे हॉटस्पॉट ठरले आहेत. 10 जुलै 473, 9 जुलै 401,8 जुलै 425, 7 जुलै 429, 6 जुलै 386 रुग्ण आढळून आले आहेत. रत्नागिरीचा मृत्यू दर 2.86 टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.80 टक्के आहे. तर, जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 4284 इतकी आहे.

इतर बातम्या:

बुलडाण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली, नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं, जिल्हा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

यवतमाळकरांना मोठा दिलासा, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक अंकावर

(Sindhudurg Corona update corona virus cases decrease from five july)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें