Rajesh Kale : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंवर तडीपारीची कारवाई; नेमकं कारण काय?

सोलापूरचे (Solapur) विद्यमान उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale ) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. राजेश काळे यांनी तडीपारीची कारवाई झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

Rajesh Kale : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंवर तडीपारीची कारवाई; नेमकं कारण काय?
राजेश काळे

सोलापूर : सोलापूरचे (Solapur) विद्यमान उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale ) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. राजेश काळे यांनी तडीपारीची कारवाई झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. काळे यांना शिवीगाळ, फसवणूक अशा विविध प्रकरणांमुळं पुढील दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आलं आहे. राजेश काळे यांना भाजपनं जानेवारी महिन्यात निलंबित केलं होतं. मात्र, ते अजून भाजपचे नगरसेवक असून सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत.

राजेश काळे यांच्याकडून तडीपारीच्या वृत्ताला दुजोरा

राजेश काळे यांच्यावर शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप होते. अखेर राजेश काळे यांना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याती जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती आहे. स्वतः राजेश काळे यांच्याकडून तडीपारीचे आदेश प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे.

राजकीय द्वेषापोटी कारवाई झाल्याच मत

राजेश काळे यांनी निवडणूका तोंडावर असताना राजकीय द्वेशापोटी कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची काळे यांनी म्हटलं आहे.

भाजपमधून राजेश काळे यांची हकालपट्टी

उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केली. तसंच उपायुक्त पांडे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा काळे यांच्यावर आरोप आहे. उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना जानेवीर महिन्यातील पहिल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर राजेश काळे यांची 13 जानेवारी रोजी भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

इतर बातम्या:

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी?

Nanded: गाडीपुरा भागात रात्री दगडफेक, दोघे गंभीर जखमी, घरांचे नुकसान, 13 अटकेत, नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता

 

Solapur Deputy Mayor Rajesh Kale get notice of Tadiapaari

Published On - 1:54 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI