Solpaur दूध संघाला गतवैभव मिळेपर्यंत अध्यक्षपदाच्या सुविधा घेणार नाही, रणजितसिंह शिंदे अ‌ॅक्शन मोडवर

Solpaur दूध संघाला गतवैभव मिळेपर्यंत अध्यक्षपदाच्या सुविधा घेणार नाही, रणजितसिंह शिंदे अ‌ॅक्शन मोडवर
रणजितसिंह शिंदे
Image Credit source: TV9

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (Solapur District Milk Association) अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रणजितसिंह शिंदे (Ranjitsingh Shinde) यांनी एक महत्वपूर्ण आणि आदर्शवत निर्णय घेतलाय.

सागर सुरवसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 19, 2022 | 5:07 PM

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (Solapur District Milk Association) अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रणजितसिंह शिंदे (Ranjitsingh Shinde) यांनी एक महत्वपूर्ण आणि आदर्शवत निर्णय घेतलाय. सोलापूर जिल्हा दूध संघ अडचणीत आहे. त्यामुळे जोपर्यंत अध्यक्षपदी आहे तोवर दूध संघाचा अध्यक्ष म्हणून मिळणाऱ्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. दूध संघाची गाडी, बैठकीचा भत्ता तसेच डिझेलचा एक रूपयाही आपण घेणार नसल्याचे नुतन अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी जाहीर केलेय. सोलापूर जिल्हा दूध संघ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला होता. त्यातच त्यावर मोठ्या प्रमाणात कर्जही झाले होते. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षापासून दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यानंतर मागील महिन्यात सोलापूर जिल्हा दूध संधाची निवडणूक लागली होती. त्यामध्ये सत्ताधारी गटाने बाजी मारत दूध संघावर विजय मिळवला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

दूध संकलन वाढवण्यावर भर

दूध संघाचे अध्यक्षपद माढा तालुक्याला मिळाले असले तरी त्याच माढा तालुक्यात आणि शेजारील करमाळा तालुक्यात सर्वात कमी दूध पुरवठा केला जातो. तसेच जिल्ह्यातील एकूण 21 हजार लीटर दूधाचे संकलन होते. हे संकलन तुलनेने खूपच कमी आहे. या पुर्वी जिल्हाभरातून एक लाखापेक्षाची जास्त लीटर दूध संकलन होत होते. त्यामुळे रणजितसिंह शिंदे यांच्यासमोर दोन्ही तालुक्यासह जिल्हाभरातून दूध संकलन वाढवण्याची मोठी नैतिक जबाबदारी असणार आहे. याच गोष्टींचा विचार करून दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दूध संघाचा अध्यक्ष म्हणून मिळणाऱ्या सर्व सुविधा आणि भत्ते नाकारून दूध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आदर्शवत आणि धाडसी निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील प्रकल्पाला भेट

अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच त्यांनी जिल्हा दूध संघाच्या मालकीची असलेल्या नवी मुंबईतील प्रकल्पालाही भेट देऊन त्या ठिकाणच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यामुळे एकंदरीतच रणजितसिंह शिंदे हे अ‌ॅक्शन मोडवर असल्याचे पहायला मिळत आहेत.

इतर बातम्या:

Punjab Cabinet: ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय

Nagpur | मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पूर्व विदर्भातील 204 किमींच्या रस्त्यांची कामे होणार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें