Vijay Wadettiwar : सुधीर मुनगंटीवारांना कमी महत्त्वाची खाती, चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची विजय वडेट्टीवारांची टीका

स्वप्न गगनाची पाहिलीत आणि जमिनीवर आदळून पडावीत, अशी खाती मिळाली. असं एकूण या खातेवाटपचं स्वरूप आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. तर, वन हैं तो कल हैंचं महत्त्व मला मिळालं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.

Vijay Wadettiwar : सुधीर मुनगंटीवारांना कमी महत्त्वाची खाती, चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची विजय वडेट्टीवारांची टीका
जिल्ह्यावर अन्याय झाल्याची विजय वडेट्टीवारांची टीका
निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 14, 2022 | 7:45 PM

चंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर माजी मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) टोला लगावला आहे. विशेषतः दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना कमी महत्त्वाची खाती मिळाल्याबद्दल त्यांना आभाळातून खाली जमिनीवर आदळले असल्याची कठोर टीका त्यांनी केली. भरारी घेताना स्वतःच्या पंखात बळ आहे का? हे बघण्याचा सल्ला त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिला. जिल्ह्याला समाधानकारक खाती मिळाली नाहीत. अन्यायच झालाय असे त्यांनी स्पष्ट केले. मागील सरकारच्या काळात मला मिळालेली खाती कमी महत्त्वाची असल्यावरून हिणविल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.

पाहा व्हिडीओ

सुधीर मुनगंटीवारांना वन खातं

सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या मंत्रीमंडळात अर्थमंत्रीपद भुषविलं. परंतु, यावेळी त्यांना वन खातं देण्यात आलंय. त्यामुळं मुनगंटीवार यांचे पंख छाटल्याचं बोललं जात आहे. फडणवीस यांच्या या धक्कातंत्रानं आश्चर्य व्यक्त केल जात आहे. यात विजय वडेट्टीवार यांनीही भर घातली. ते म्हणाले, मला मंत्रीपद मिळालं. त्यावेळी मुनगंटीवार मला कमी दर्जाचं खातं मिळाल्याची टीका करत होते. यावेळी त्यांनाही कमी दर्जाचं खातं देण्यात आलं.

मुनगंटीवार आभाळातून खाली आदळले

या आधीच्या युती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं अर्थ आणि वन खातं होतं. त्यामुळं त्यांच्याकडं यावेळी महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे कांत देण्यात आलं आहे. मुनगंटीवार आभाळातून खाली आदळल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला समाधानकारण खाती मिळाली नसल्याची नाराजी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

वन हैं तो कल हैं

सुधीर मुनगंटीवार यांना कमी महत्त्वाची खाती मिळाली. ते आभाळातून खाली आदळले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. चंद्रपूरला समाधानकारक खाती मिळाली नाही, हे स्पष्ट झालंय. काहींच्या पदरी आशा, काहींच्या पदरी निराशा पडली. स्वप्नांचा काहींना भंग झाला आहे. स्वप्न गगनाची पाहिलीत आणि जमिनीवर आदळून पडावीत, अशी खाती मिळाली. असं एकूण या खातेवाटपचं स्वरूप आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. तर, वन हैं तो कल हैंचं महत्त्व मला मिळालं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें