शिक्षिकेचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, वारंवार धडकणाऱ्या आदेशांनी होतंय शैक्षणिक नुकसान

वैशाली गेडाम यांनी दाखवलेल्या धाडसाचं राज्यभरातून शिक्षक कौतुक करीत आहेत. हे पत्र शासनविरोधी नसून, शिक्षणाच्या भल्यासाठी आहे. त्यामुळं मला कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असंही वैशाली गेडाम सज्जडपणे सांगतात.

 शिक्षिकेचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, वारंवार धडकणाऱ्या आदेशांनी होतंय शैक्षणिक नुकसान
शिक्षिकेनं शिक्षणमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 6:06 PM

चंद्रपूर : शिक्षकांवर शैक्षणिक कार्य सोडून अवांतर कामांचा बोजा लादण्यात आला. त्यामुळं शिक्षक विद्यादानाचं कार्य प्रामाणिकपणे करू शकत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, अशी खंत वैशाली गेडाम नामक एका शिक्षिकेनं व्यक्त केलीय. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम जिवती तालुक्यात गोंडगुडा इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. शिक्षणमंत्री (Education Minister), शिक्षण सचिव (Education Secretary) आणि शिक्षण संचालकांना त्यांनी लिहिलेलं दीर्घ पत्र सध्या समाजमाध्यमात चांगलंच व्हायरल होत आहे.

या पत्रात त्यांनी एकूणच शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी योजलेले उपक्रम, शाळा आणि विद्यार्थ्यांचे केले जाणारे मूल्यांकनावर प्रकाश टाकलाय. शिक्षकांवर रोज येऊन आदळणारी शासकीय परिपत्रके, त्यातून विद्यादानात होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांवर मत व्यक्त करण्यात आली. यात सुधारणा करण्याची मागणी केलीय.

सध्या या पत्रामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अध्ययन स्तर निश्चितीसारखे प्रकार कोणत्या तज्ज्ञाने संशोधित केले. यावर प्रश्न उपस्थित करून, शिकवणारी यंत्रणाच जर अवांतर कामांना जुंपली जात असेल तर गुणवत्ता कशी वाढणार? शिक्षकांना शिकवण्याचं स्वातंत्र्य नसेल, शिक्षकांमधील गुणवत्ता दाबून ठेवणाऱ्या योजना आणल्या जात असतील, तर शैक्षणिक गुणवत्ता वाढणार कशी, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

शिक्षकांनी शाळेत काय करावं, हे शासनानं न सांगता पर्यवेक्षण करावं. शिक्षक शाळेत योग्य शिकवतात की नाही, वेळेवर येतात की नाही, व्यसन करतोय का, गैरहजर असतो काय, त्यांची वागणूक कशी आहे, याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. पण असं काहीच होत नाही.

रोज नवे उपक्रम, रोज नवे परिपत्रक, रोज नवनव्या लिंक भरणं, यातच शिक्षकांचा वेळ वाया जातोय. यातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल, असा खडा सवाल त्यांनी शासनाला केलाय. सध्या या पत्राची मोठी चर्चा सुरू आहे.

वैशाली गेडाम यांनी दाखवलेल्या धाडसाचं राज्यभरातून शिक्षक कौतुक करीत आहेत. हे पत्र शासनविरोधी नसून, शिक्षणाच्या भल्यासाठी आहे. त्यामुळं मला कुणालाही घाबरण्याची गरज नाही, असंही वैशाली गेडाम सज्जडपणे सांगतात.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.